प्रदीप भणगे, कल्याण : अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. युसूफ शेख असे त्याचे नाव असून धक्कादायक म्हणजे तो चक्क मनसेचा जुना झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसाची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी युसूफ शेख याचा भाऊ जलालूद्दीन शेख यानेच अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुरावा म्हणून एका पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना दिले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये युसूफ शेख हा एका खोलीत उभा असून त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमांस कापत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या कत्तल करण्यात आली. या गोवंशांचं मांस एका फोर्ड इंडिव्हर गाडीत ठेवले जात असून ही गाडी युसूफ शेख याचीच आहे, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर मनसेचा जुना झेंडा सुद्धा आहे. युसूफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमांस विक्रीचा धंदा असून यापूर्वी सुद्धा एकदा त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यावेळेस पक्षाने त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. पण आता राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसूफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.तक्रारदार भाऊ जलालुद्दिन करीम शेख याने पोलिसांना सांगितले की, माझ्या दुकानाच्या जवळच युसुफ कासिम शेख याचे मटण विक्रीचे दुकान आहे. ७ डिसेंबरला सकाळी एका अनोळखी इसमाने गोवंशीय जनावरांची हत्या होत असल्याचे ३ व्हिडीओ व्हॉट्सअॅपव्दारे पाठविले. व्हिडीओ मी पाहिले असता त्यात युसूफ कासिम शेख हा चौधरी क्लिनिक, एस.व्ही.पी. रोड, वुलन चाळ, अंबरनाथ पश्चिम येथे एका रुममध्ये उभा असून त्याचे साथीदार गोवंशीय जनावरे कापत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये युसूफ शेख याची इंडिवर गाडी नं. MH01 PA 9186 गाडी मोकळया जागेत उभी असल्याचे दिसतअसून त्या गाडीजवळ काही गोवंशीय जनावरे कापलेली व त्यांचे मांस काही लोक गाडीमध्ये ठेवताना दिसत आहे.दरम्यान गुन्ह्याच्या तपासासाठी युसुफच्या भावाने ते व्हिडीओ मोबाईलमधून पेनड्राईव्हमध्ये दिले. तर पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YTQ6FI7
No comments:
Post a Comment