ठाणे : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची वाईट अवस्था पाहून त्याच्यासाठी आता महाराष्ट्राचे यांनी धाव घेतली आहे. विनोद कांबळीला ठाण्याच्या आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समजताच एकनाथ शिंदे यांनी आता विनोद कांबळीला तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे.एकनाथ शिंदे यांना विनोद कांबळीची परिस्थिती बिकट असल्याचे समजले. आपल्याला स्वत:ला जाता येणार नाही, हे एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी आपले विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना विनोद कांबळीची भेट घ्यायला सांगितली. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळीच्या प्रकृतीची भेट घेऊन चौकशी केली. त्याचबरोबर मंगेश चिवटे यांनी आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळीच्या उपचारात कोणतीही कमी राहणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंतीही केली.विनोद कांबळीच्या उपचारांचा खर्च आता त्याचे चाहते शैलेश ठाकूर यांनी उचलला आहे. पण सध्याच्या घडीला विनोद कांबळीची मिळकत काहीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विनोद कांबळी आणि त्याच्या कुटुंबियांना या कठीण काळात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार यांनी मदत केली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून विनोद कांबळीला त्वरीत पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही पाच लाखांची मदत पुढील आठवड्यात विनोद कांबळीला देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळीने कृतज्ञता व्यक्त केली आहे, तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली आहे. काही दिवसांतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळीची भेट घेऊन त्याच्या कुटुंबियांना मदत करणार आहेत. विनोद कांबळीला आता मदतीचा ओघ सुरु झाला आहे. पण विनोद कांबळीची तब्येत पूर्ववत कधी होते, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये विनोद कांबळीवर काय उपचार केले जातात आणि भविष्यात विनोद कांबळी या उपचारांना कसा प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/F8gs3av
No comments:
Post a Comment