Breaking

Saturday, December 7, 2024

भारताचे दोन संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी मैदानात उतरणार, दोन्ही सामने कधी सुरु होणार पाहा... https://ift.tt/J7r9O2l

नवी दिल्ली : आणि ऑस्ट्रेलियाचे दोन संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार असल्याचे आता समोर आले आहे महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियातच होणार आहेत. भारत आणि यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पिंक बॉल टेस्ट म्हणून हा सामना प्रकाशझोतात आला आहे. या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस असणार आहे. रविवारी अजून एक भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच उतरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.०० वाजता सुरु होणार आहे.काही महिन्यांपासून फलंदाजी हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा कच्चा दुवा झाला आहे. संघातील बदलानंतरही त्यात फरक पडलेला नाही. भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आज, रविवारी होणाऱ्या दुसऱ्या वन-डेत हेच आव्हान असेल. फलंदाजी बहरल्यास भारतास विजयाची आशा असेल. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी भारतास विजय आवश्यक आहे. हा सामना पहाटे ५.१५ वाजता सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ केवळ शंभर धावांवर बाद झाला होता. त्यामुळे पाच विकेटनी हार पत्करावी लागली होती. त्यापेक्षाही चेंडूचा फरक लक्षात घेतल्यास ती भारताची सर्वांत लाजीरवाणी हार होती. भारतीय महिला संघाने कधीही ऑस्ट्रेलियात वन-डे मालिका जिंकलेली नाही. नऊ महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन-डे खेळत आहे; पण त्यांची ताकद कमी झालेली नाही.भारतीय संघच पूर्वतयारीत कमी पडला आहे. ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू देशातील टी-२० स्पर्धा खेळले अथवा त्यांचा बिग बॅश लीगमध्ये सहभाग होता. त्यातच ऑस्ट्रेलियातील दोन सराव सत्रे पावसामुळे वाया गेली. कदाचित यामुळेच पहिल्या सामन्यात एकदाही भारतीय जोडी जमली नाही. ‘फलंदाजांनी चिकाटी आणि संयम दाखवला असता तर आम्ही नक्कीच चांगली धावसंख्या उभारली असती. हे साध्य झाले असते तर काहीही घडू शकले असते,’ असे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सामन्यानंतर सांगितले होते. भारतातच होणारी वर्ल्ड कप वन-डे स्पर्धा नजीक येत आहे, त्यापूर्वी फलंदाजी स्थिरावणे आवश्यक आहे. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/noPJrev

No comments:

Post a Comment