निलेश पाटील, जळगाव : जळगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमनी गाडीचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ओमनीच्या अपघातात चोपड्याचे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिहेरी अपघाताची ही घटना घडली.
तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू तर चौघे जखमी
चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील आणि शिवाजी नगर मधील एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. टॅक्सी मधील बसलेला प्रवासी ज्ञानेश्वर सोनार रा. सुरत याला डॉ. सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आलं आहे. तर एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच इतर जखमींना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.कॅटरर्सचं काम करण्यासाठी निघालेले, अनर्थ घडला
चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे कॅटरर्सचं काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलसीट मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एल ८६९३ आणि आणखी एका मोटरसायकलवर ट्रीपलसीट चोपड्याकडे निघाले होते. दोन्ही बाईकवर मिळून सहा जण ट्रिपलसीट होते. त्यावेळी चोपड्याकडून टॅक्सी क्रमांक एम एच १९ वाय १८२८ येत होती. टॅक्सीमध्ये १२ जण होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.टॅक्सी चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण...
समोरुन दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या. टॅक्सी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही मोटारसायकलची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंगमध्ये अडकले होते. तर दोन्ही मोटारसायकल रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5ukxWRO
No comments:
Post a Comment