मेलबर्न: ची चौथी कसोटी MCG येथे खेळवली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव आता संपला आहे. आणि वॉशिंग्टन सुंदरच्या लढाऊ अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडिया ३६९ धावा करून ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाकडे आता १०५ धावांची आघाडी आहे.भारताने कालचा दिवस आपल्या नावावर केला. नितीश कुमार रेड्डीने काल कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले तर वॉशिंग्टन सुंदरने शानदार अर्धशतक ठोकले. नितीशने ऐतिहसिक शतक १७२ चेंडूत केले तर तो सर्वात तरुण तिसरा खेळाडू ठरला ज्याने शतक ठोकले. भारताला चौथ्या दिवसी जास्त काळ मैदानावर टिकून राहता आले नाही आणि भारत ३६९ धावांवर संघ आटोपला. भारताच्या पहिल्या डावात तीन विकेट पटापट कोसळल्या परंतु यशस्वी जैस्वाल त्याची जागा धरुन होता आणि त्याला साथ देत होता विराट कोहली. यशस्वी शतकाच्या अगदी जवळ आला होता मात्र, ८२ धावा करुन बाद झाला आणि इथून भारताची उतरती कळा सुरु झाली. यशस्वी बाद होताच विराटही ३६ धावा करुन बाद झाला तर नाईट वाॅचमॅन म्हणून आलेला आकाश दीप खाते न उघडता परतला. त्यानंतर ऋषभ पंतने २८ धावा केल्या तर रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या. यानंतर भारत काही विशेष करु शकेल असे कोणालाच वाटले नव्हते. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीकडून केवळ फाॅलोओन टाळतील इतक्या अपेक्षा होत्या मात्र, या दोघांनी मिळून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. भारत २२१ वर सात बाद असताना वॉशिंग्टन सुंदर आणि नितीशने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. सर्वप्रथम नितीशने ८० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि यासोबतच अर्धशतकाचे खास सेलिब्रेशन पुष्पा स्टाईलने केले. नितीशच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फाॅलोओन टाळला त्यानंतर सुंदरने १६२ चेंडूत १ चौकारसह शानदार अर्धशतक पूर्ण केले. नितीशने अर्धशतकाला मोठ्या खेळीत नेत शतक झळकावले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TOH41KX
No comments:
Post a Comment