Breaking

Saturday, December 28, 2024

मृत कोंबड्यांच्या तोंडावर आग येत होती? सोशल मीडियावरील व्हायरल Video चं सत्य काय? https://ift.tt/TlgyVLG

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये काही कोंबड्या मृतावस्थेत दिसत आहेत. मृत कोंबड्यांचं ज्यावेळी पोट दाबलं जातं, त्यावेळी त्यांच्या तोंडातून आग येत असल्याचं व्हिडिओत दिसतं आहे.

काय आहे नेमका दावा?

सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत दावा केलाय, की मृत झालेला कोंबडा आग ओकत आहे. एक्स युजरने दावा केलाय, गावातील सर्व कोंबड्यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू होत असल्याने सकलेशपूरमध्ये दहशत निर्माण झाली आहे.यूट्यूब चॅनेल Wild life 1635 ने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की कोंबड्याचा दिवाळीत बॉम्ब खाल्यानंतर मृत्यू झाला.एक फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, की सकलेशपूरच्या हनाबालू हदीगे गावात काही उपद्रवी लोकांनी कोंबड्यांना विष दिलं. मृत्यू झालेल्या कोंबड्यांच्या तोंडातून ड्रॅगनप्रमाणे आग निघत आहे. ते पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले आहेत.

काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

कर्नाटकातील हासन जिल्ह्यात एक सकलेशपूर तालुका आहे. येथील एक इन्स्पेक्टर सदाशिव यांच्याशी याबाबत चर्चा केली. सकलेशपूरमध्ये कोंबड्यांचा गूढ मृत्यू आणि मृत कोंबड्याच्या तोंडातून आग निघत असल्याचा दावा खरा आहे का? असा सवाल त्यांना केला.त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की रवी नावाच्या व्यक्तीने असा दावा केला आहे, परंतु त्याने पोलिसात तक्रार केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील धक्कादायक दावा पाहून आम्ही आमची टीम घटनास्थळी पाठवली, मात्र तोपर्यंत रवी या व्यक्तीने आपल्या कोंबड्या पुरल्या होत्या.कोंबड्याच्या तोंडातून आग निघताना गावकऱ्यांनी पाहिलं आहे का, हे जाणून घ्यायचं होतं, त्यावर इन्स्पेक्टर सदाशिव म्हणाले, असं कुणीही सांगितलं नव्हतं. ते म्हणाले की, घटनेला चार-पाच दिवस उलटून गेले, पण रवीने अद्याप पोलिसांत तक्रार केलेली नाही. मात्र, यासंबंधी कोणतीही तक्रार आल्यास कोंबड्यांची तपासणी केली जाईल, असंही पशुवैद्यकांशी संवादावेळी सांगण्यात आलं आहे. कोंबडीचा गूढ मृत्यू आणि मृत्यूनंतर तोंडातून आग निघत असल्याचा दावा खरा आहे का? याबाबत विचारलं असता त्यांनी याला कोणताही पुरावा नसल्याचं सांगितलं. तपासणीत कर्नाटकातील सकलेशपूर येथे कोंबडीचा मृत्यू झाल्याची बातमी खरी असल्याचं समोर आलं आहे, पण मृत कोंबडीच्या तोंडातून आग निघाल्याच्या दाव्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0wn1Azd

No comments:

Post a Comment