मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आज १ जानेवारी रोजी आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी केरळमध्ये झाला. विद्या बालनने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर असंख्य हृदयांवर राज्य केले. विद्याचा आतापर्यंतचा प्रवास खूप यशस्वी ठरला असून तिला ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.विद्याचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले. तिचे सुरुवातीचे शालेय शिक्षण अँथनी गर्ल्स स्कूल, चेंबूर, मुंबई येथून झाले. पुढे तिने मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. २०११ मध्ये आलेला डर्टी पिक्चर हा चित्रपट विद्या बालनच्या करिअरला टर्निंग पॉइंट ठरला. मिलन लुथरा यांच्या या चित्रपटात विद्याने सिल्क स्मिताच्या व्यक्तिरेखेत बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे विद्याला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. एका मल्याळम दिग्दर्शकाने तर तिला अपशकूनीही म्हटले होते.विद्याला तिच्या फिल्मी करिअरचा पहिला ब्रेक 'परिणिती' या सिनेमातून मिळाला. या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. २०१४ मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. लगे रहो मुन्नाभाई, तुम्हारी सुल्लू आणि बेगम जान यांसारख्या चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनने हम पांच या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. विद्या बालन ही चित्रपटसृष्टीतील जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मालमत्ता आणि एकूण संपत्ती बद्दल जाणून घेऊ.मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्या बालनची एकूण संपत्ती १८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे १३४ कोटी रुपये आहे. ती चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. तिच्याकडे १४ कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट तिला तिच्या पतीने गिफ्ट केले होते. याशिवाय अभिनेत्रीच्या एका फ्लॅटची किंमत ८ कोटी रुपये आहे. तिच्या संपत्तीमध्ये मर्सिडीज ई-क्लास आणि सेडान सारख्या भव्य कारचाही समावेश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7oJGE3b
No comments:
Post a Comment