Breaking

Tuesday, December 31, 2024

पोटचा लेक विद्रुप असल्यामुळे नाना करायचे राग राग, तो गेल्यावर कळली किंमत; सिगाटेरचं व्यसन लागलं आणि... https://ift.tt/PbDrLeE

मुंबई- मराठी तसेच बॉलिवूडचे दिग्गज कलाकार हे केवळ अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते आहेतच पण एक संवेदनशील व्यक्ती देखील आहेत. आजच्या काळात निरोगी जीवनशैली आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध झालेले नाना एके काळी धुम्रपानाच्या अगदीच आहारी गेलेले. आज नाना १ जानेवारीला त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याबद्दल एक खास किस्सा जाणून घेऊ. नाना पाटेकर यांचे धूम्रपानाचे व्यसन नाना पाटेकर यांनी त्यांच्या आयुष्यात धूम्रपानाच्या व्यसनाशी संघर्ष केला आहे. एक काळ असा होता जेव्हा ते दिवसाला ६० पेक्षा जास्त सिगारेट ओढायचे. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना धक्का बसला होता. तसेच त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते. नानांनी आपल्या मुलाचा द्वेष का करायचे? नाना म्हणाले होते की, ' काही खास माणसांनी मला नीट समजावून सांगितले तेव्हा मी ही सवय सोडली. नानांनी सांगितले की, माझा मुलगा जन्माला आला तेव्हा मी त्याचे नाव दुर्वासा ठेवले होते. जन्मापासूनच त्यांच्या एका डोळ्यात समस्या असल्याने त्याला दिसत नव्हते. माझा मुलगा कसा दिसतो याबद्दल लोक काय विचार करतील याचा मला तिरस्कार होऊ लागला होता. मी कधीच विचार केला नाही की त्या मुलाला काय वाटत असेल. मुलाच्या मृत्यूने अभिनेत्याला धक्का बसला नाना म्हणाले, 'अडीच वर्षांनी तो आम्हाला सोडून गेला. काही करता येत नव्हचे, काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. यानंतर मला धक्का बसला आणि मी सिगारेटच्या आहारी गेलो. अंघोळ करतानाही मी सिगारेट ओढायचो. नाना दिवसाला ६० सिगारेट ओढायचे नाना म्हणतात, 'परिस्थिती इतकी खराब झाली होती की मी दिवसाला ६० सिगारेट ओढायचो. दुर्गंधीमुळे माझ्या गाडीतही कोणी बसायला मागत नव्हते. मी दारू कधीच प्यायलो नसलो तरी मी खूप प्रमाणात सिगारेट ओढू लागलो. या व्यक्तीमुळे सोडली सिगरेट नानांनी सांगितले की, 'माझ्या बहिणीच्या ओरड्यामुळे मला सिगारेट सोडण्यास भाग पाडले. माझ्या बहिणीने तिचा मुलगा गमावला होता आणि एक दिवस तिने मला खोकताना पाहिले आणि म्हणाली, तुला आणखी काय पाहायचे आहे? हे ऐकून मला वाईट वाटले आणि मी धूम्रपान सोडले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AjhQ5dY

No comments:

Post a Comment