मुंबई : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रणालीअंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
सीटबेल्ट कारवाई एकदाच
या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत असून, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास कारवाई केली जात आहे. पूर्वी सीटबेल्ट नसल्यास प्रत्येक कॅमेऱ्याद्वारे कारवाईचा बडगा उगारला जात होता. मात्र, आता ‘एआय’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकदाच सीटबेल्टची कारवाई होणार आहे.‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूंनी ‘एआय’ आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या प्रणालीअंतर्गत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलन देण्यात येत आहे. तरी सर्व वाहनधारकांनी वाहतूक करताना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी,’ असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.४००हून अधिक कॅमेरे
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांमुळे १७ प्रकारच्या नियमभंगाच्या प्रकारांवर कारवाई करता येणे शक्य होणार आहे. ‘एक्स्प्रेस-वे’वरील ९४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण ४००हून अधिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.‘लगेचच दंड वसुलीही’
‘एमएसआरडीसी’, परिवहन विभाग, वाहतूक पोलिस यांच्याकडून एकत्रित कारवाई करण्यात येणार आहे. टोलनाक्यांवरील पोलिसांना नियमभंग केलेल्या वाहनांची माहिती यामुळे आगाऊ देण्यात येणार असून, संबंधित वाहनचालकांकडून लगेचच दंडवसुलीही शक्य होणार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.'एक्स्प्रेस-वे'वर वाहनांसाठी वेगमर्यादा
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’ वर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) यासाठी वेगमर्यादा ६० किमी ताशी असून, उर्वरित सर्व वाहनांची वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) यांची वेगमर्यादा १०० किलोमीटर ताशी असून, उर्वरित सर्व वाहनांची वेगमर्यादा ८० किलोमीटर ताशी आहे. या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसल्यास त्या वाहनांवर अनेक वेळा कारवाई होऊ शकते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/efsbmA1
No comments:
Post a Comment