Breaking

Monday, December 9, 2024

पाकिस्तानचं डोकं पुन्हा फिरलं, भारतातील टी २० वर्ल्ड कपबाबत आयसीसीकडे केली अजब मागणी https://ift.tt/t8URnjF

नवी दिल्ली : पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर आहे का... असा प्रश्न सर्वांना पडू शकतो. कारण पाकिस्तानचे वागणे आता त्रासदायक होऊ लागले आहे. एकिकडे पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मान्य केले आहे. पण ही गोष्ट मान्य करताना त्यांनी भारतामध्ये होणााऱ्या टी २० वर्ल्ड कपबाबत अजब मागणी आयसीसीकडे केली आहे.

पाकिस्तानने कसला हट्ट केला होता...

भारत पाकिस्तानात खेळणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. पण हट्टाला पेटला आणि भारताने आमच्या देशात खेळायला यायलाच हवे, अशी मागणी जोर लावून धरली. अखेर आयसीसीने पाकिस्तानला हायब्रिड मॉडेल मान्य करायला सांगितले आणि त्यांनी ते केले. पण आता भारतामधील टी २० वर्ल्ड कपबाबत मात्र पाकिस्तानने अजब मागणी केली आहे.

पाकिस्तानने आयसीसीपुढे कोणती अट ठेवली होती...

पाकिस्तानने हायब्रिड मॉडेल मान्य करताना आयसीसीपुढे एक मोठी अट ठेवली होती. पाकिस्तानने म्हटले होते की, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवण्यास तयार आहोत. त्यानुसार भारताचे सामने पाकिस्तानबाहेर होतील. पण यापुढे ज्या आयसीसीच्या स्पर्धा भारतामध्ये होतील, त्यामध्ये पाकिस्तान त्यांच्या देशात जाऊन खेळणार नाहीत. आयसीसीच्या भारतामधील स्पर्धा आमच्यासाठी हायब्रिड मॉडेलवर खेळवण्यात याव्यात.

आयसीसीने पाकिस्तानच्या मागणीबाबत काय सांगितले होते...

पाकिस्तानने २०३१ पर्यंत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवाव्या असे म्हटले होते. आयसीसीने या मागणीचा विचार केला आणि त्यांनी पाकिस्तानला आश्वस्त करताना म्हटले की, २०२७ पर्यंतच्या भारताच्या स्पर्धा या हायब्रिड मॉडेलवर खेळवण्यात येतील. भारतामध्ये २०२६ साली खेळवला जाणार आहे. यावर पाकिस्तानचा डोळा असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानने आता कोणती अजब मागणी केली आहे...

आयसीसीने पाकिस्तानची मागणी मान्य केली होती. पण आता पाकिस्तानचा आयसीसीवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. कारण आता पाकिस्तानने आयसीसीला सांगितले आहे की, " भारतामधील आयसीसीच्या स्पर्धा या हायब्रिड मॉडेलवर खेळवण्यात येतील, हे जे तुम्ही म्हटले आहे ते आम्हाला लिखित स्वरुपात द्यायला हवे." जेव्हा कोणत्याही स्पर्धेचे वेळापत्रक बनवले जाते तेव्हा सामने कुठे खेळवायचे हे ठरवले जाते. त्यामुळे आता आयसीसी ही गोष्ट कशी लिहून देणार, हे पाकिस्तानला समजलेले नाही किंवा समजले असले तरी ते आयसीसीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आयसीसी पाकिस्तानला का उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.आयसीसी आता पाकिस्तानची ही मागणी मान्य करते की धुडकावते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5zUBN41

No comments:

Post a Comment