Breaking

Friday, December 13, 2024

गाबा कसोटीसाठी नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भारताच्या Playing XI मध्ये २ मोठे बदल https://ift.tt/lD6qdth

गाबा: भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियापाच सामन्यांची कसोटीमालिका खेळवली जात आहे. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी ही गाबा येथे खेळवली जात आहे. गाबा कसोटीसाठी नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने पडला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आसून भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी नाणेफेक सुरू असतानाच भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात दोन बदल अपेक्षित होते, जे पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. रोहितने ॲडलेड कसोटीत खेळलेले अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि हर्षित राणा यांना संघातून वगळले आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे, तर आकाश दीपला प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला असून, स्कॉट बोलंडच्या जागी जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे.

आकाश दीपला संधी मिळाली

दुसरीकडे, पर्थमध्ये आपली छाप सोडणारा हर्षित राणा ॲडलेडमध्ये निस्तेज दिसत होता. आता त्याची जागा आकाश दीपने घेतली आहे, ज्याने अलीकडच्या काळात कसोटीत चमकदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजी कौशल्याची तुलना मोहम्मद शमीशी केली जाते. गाबाची विकेट वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अचूक लाइन-लेंथ असलेल्या गोलंदाजांना या विकेटवर यश मिळण्याची अपेक्षा आहे. आकाशदीप याच गोष्टीसाठी ओळखला जातो. याशिवाय, तो सीम हालचालीच्या मदतीने चेंडू आत आणण्यातही माहीर आहे. त्यामुळे त्याला या खेळपट्टीवर संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kqTZX8U

No comments:

Post a Comment