Breaking

Friday, December 13, 2024

Raj Kapoor 100 th Birth Anniversary: जिवापाड प्रेम केल्यानंतर 'ती' दुसऱ्याची झाल्यावर खचलेले राज कपूर, रोज दारू पिऊन रडायचे अन् सिगरेटने स्वत:ला जाळायचे https://ift.tt/bkALpws

मुंबई- ‘नाम मेरा जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’, ‘दिवानी’ आणि ‘प्रेम रोग’…असे कितीतरी सुपरहिट चित्रपट आहेत, ज्यांच्याबद्दल बोलले की लगेच, यांची आठवणही येतेच. राज कपूर यांची आज १४ डिसेंबर रोजी १०० वी जयंती आहे, कपूर कुटुंबाने या सुपरस्टारची जयंती धुमधडाकक्यात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० व्या जयंती निमित्त आपणही आज राज कपूर यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊ. त्यांचे सिनेमे सुपरहिट व्हायचेच पण त्यांची लव्हलाइफसुद्धा खूप गाजली. हिंदी सिनेसृष्टीतील बादशाह म्हटले जाणारे राज कपूर त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे सुद्धा खूप चर्चेत होते. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा राज कपूर यांचे नाव ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री नर्गिससोबत जोडले गेले होते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण असं काय झालं की राज कपूर रात्रभर त्यांच्यासाठी रडत राहिले? या अभिनेत्रीसाठी राज कपूर रात्रभर रडत राहिले ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘अनाडी’, ‘चोरी-चोरी’… अशा अनेक चित्रपटांत राज कपूर आणि यांची जोडी एकत्र दिसली होती. चित्रपटात काम करताना दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सिनेजगतात होती. असे म्हटले जात होते की दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली असली तरी खऱ्या आयुष्यात सर्वकाही उलट होते. नर्गिसने १९५८ मध्ये सुनील दत्तसोबत लग्न केले, त्यानंतर राज कपूर उद्ध्वस्त झाले. या विश्वासघातानंतर राज कपूर स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. मधु जैन यांच्या 'द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज कपूरच्या म्हणण्यानुसार त्यांची फसवणूक झाली आहे. अशा स्थितीत ते इतके अस्वस्थ झाले की ते बाथरूममध्ये रडायचे आणि सिगारेटने स्वत:ला जाळून घ्यायचे. "नर्गिसने माझी फसवणूक केली" या पुस्तकानुसार, नर्गिससोबत ब्रेकअप झाल्यानंतर राज कपूर यांनी एका पत्रकाराला सांगितले होते की, सर्व लोक मला म्हणतात की मी नर्गिसला निराश केले आहे. पण खरेतर तिने माझी फसवणूक केली हे सत्य आहे. नर्गिसच्या लग्नाची बातमी ऐकून राज कपूर आपल्या मित्रांसमोर रडले. वेदना सहन करण्यासाठी, त्यांनी सिगारेटने स्वत: ला जाळून घेण्यासही सुरुवात केली. दारूच्या व्यसनाने कुटुंब त्रस्त! या सर्व प्रकारानंतर राज कपूर खूप मद्यपान करू लागले. त्यामुळे त्यांची पत्नी कृष्णा कपूर आणि कुटुंबीयही चिंतेत पडले. त्यांच्या पत्नीने सांगितले होते की- “ते नशेत येतात आणि बाथटबमध्ये बेशुद्ध पडतात. आम्ही रात्रभर खूप रडतो आणि हे दररोज रात्री घडते. ” पुस्तकामध्ये असेही नमूद केले आहे की, राज कपूर यांचे नर्गिसवर खरे प्रेम होते आणि ते त्यांच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला सोडण्यासही तयार होते. सार्वजनिक व्यासपीठावर त्यांनी नर्गिसविरोधात एक शब्दही बोलला नव्हता. मात्र नर्गिसच्या भावांवर आरोप करण्यात आले. त्यांच्या भावांमध्ये दोघांमध्ये तेढ निर्माण केली, असा त्यांचा समज होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ni892FE

No comments:

Post a Comment