Breaking

Saturday, December 14, 2024

गर्लफ्रेंडविषयी मी जास्त... विश्वविजेता डी. गुकेश असं का बोलून गेला जाणून घ्या... https://ift.tt/XVBifRP

नवी दिल्ली : डी. गुकेशने भारताचे नाव उंचावले. तिंरगा डौलात फडकवला. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन बनला. गुकेशवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुकेशने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना तर दिले आहेच, पण विश्वनाथन आनंद यांचे नाव घेण्यासही तो विसरला नाही. पण जेव्हा गुकेशला गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने भन्नाट उत्तर दिले.गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन बनल्यावर गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गुकेश म्हणाला की, " गर्लफ्रेंडबाबत मी जास्त विचारच करत नाही. मला वाटत नाही की, ही योग्य वेळ आहे. कारण गर्लफ्रेंड असली तर त्याचा परीणाम खेळावर होऊ शकतो. माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही. गर्लफ्रेंड असली असती तर बुद्धिबळावर आता जेवढं जास्त लक्ष देऊ शकतो, तेवढं देऊ शकलो नसतो. कारण खेळाचा वेळ तिकडे खर्च होऊ शकतो.""सुमारे अकरा वर्षांपूर्वी भारताकडून बुद्धिबळातील जगज्जेतेपद दुरावले, ते मी पाहिले होते. त्या वेळी मी ते विजेतेपद भारतास जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न दहा वर्षे बघत होतो. ते प्रत्यक्षात येणे याशिवाय अजून काय जास्त असू शकते," अशी भावना भारताचा नवा जगज्जेता दोम्माराजू गुकेशने व्यक्त केली होती. जगज्जेतेपद जिंकल्यानंतर गुकेशला अश्रू आवरता आले नाहीत. " या विजेतेपदाची मला खूपच आस लागली होती. सहा-सात वर्षांचा असल्यापासून हे विजेतेपद कायम खुणावत होते. मला ते जिंकायचे होते. प्रत्येक बुद्धिबळपटूचे हे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव मी घेत आहे. त्यासाठी मी देवाचा खूप आभारी आहे. कँडिडेट्समधील यशापासून आतापर्यंतचा प्रवास देवाचे आशीर्वाद असल्यामुळेच शक्य झाला," अशी भावना गुकेशने व्यक्त केली. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. माझ्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बोलताना काहीतरी वेड्यासारखेही बोलू शकतो, असे म्हणताना गुकेशला हसू आवरत नव्हते; मात्र तो काही वेळातच शांत झाला. " देशाचे प्रतिनिधित्त्व करणे हा बहुमानच असतो. अकरा वर्षांपूर्वी भारतात झालेली जगज्जेतेपदाची लढत अजूनही मला आठवत आहे. ते २०१३ वर्ष होते. त्या वेळी मी काचेच्या पलीकडून सामना बघितला होता. ती लढत पाहताना आपणही शांतपणे खेळ करायचा, हे ठरवले होते. त्याच वेळी भारतात हे जगज्जेतेपद जिंकून द्यायचे, हे स्वप्न पाहिले होते," असे गुकेशने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0IM2wdU

No comments:

Post a Comment