मुंबई- बॉलिवूड अभिनेता आज म्हणजेच १६ जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थ आज ४० वर्षांचा झाला. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तो नुकताच पत्नी कियारा अडवाणीसोबत परदेशी रवाना झाला. सिद्धार्थची आतापर्यंतची चित्रपट कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. मॉडेलिंगपासून सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थने नंतर चित्रपटांमध्येही आपले आपले पाय रोवायला सुरुवात केली. प्रत्येक मुलाप्रमाणे त्यालाही बालपणी खूप मार पडलेला. एकदा तर त्याच्या आईने त्याला चप्पलांनी मार दिलेला. जाणून घेऊ काय घडलेलं सिद्धार्थसोबत सिद्धार्थने बी.कॉम केले. सिद्धार्थचा जन्म दिल्लीत झाला आणि येथूनच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तो वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी मॉडेलिंग करत होता पण नंतर त्याने बराच काळ या क्षेत्रात या काम केले होते. सिद्धार्थच्या कुटुंबाला काळजी सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझी खूप काळजी वाटत होती. मी अभ्यासात अजिबात हुशार नव्हतो त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना वाटले की मी भविष्यात काहीही करू शकणार नाही. त्यांना माझ्यावर बिल्कुल भरवता नव्हता. जेव्हा सिद्धार्थला आलेले अपयश सिद्धार्थ म्हणाला होता, 'शाळेत असताना मी अभ्यासात खूप ढ होतो. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने, माझ्या घरी अभ्यासाला खूप महत्त्व दिले जात होते. मी नववीत असताना एकदा नापास झालो. मग माझ्या आईने मला चप्पलने बेदम मारलेले. पप्पांना मिळाला दिलासा सिद्धार्थने पुढे सांगितले की, 'माझ्या वडिलांना काळजी होती की मी करिअरच्या शर्यतीत मागे पडू शकतो. पण हळू हळू मॉडेलिंगनंतर मी सिनेमात काम करु लागलो. मला थोडे फार यश मिळू लागले तेव्हा कुठे माझ्या वडिलांना सुटकेचा निश्वास सोडला होता. या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ दिसला होता सिद्धार्थने 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 'एक व्हिलन', 'अय्यारी', 'कपूर अँड सन्स', 'बार बार देखो', 'मरजावां', शेरशाह, योद्धा, मिशन मजनू, हसी तो फसी, छॅन्क गॉड यांसाराख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AmybqcZ
No comments:
Post a Comment