मुंबई- साऊथकडील सुपरस्टार विजय सेतुपती आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सहावी इयत्तेनंतर हा अभिनेता चेन्नईला आला, तिथे त्याने वयाच्या १६ व्या वर्षी 'नम्मावर' नावाच्या चित्रपटासाठी पहिल्यांदा ऑडिशन दिले. पण त्याच्या कमी उंचीमुळे त्याला प्रत्येकाने भूमिकेसाठी नकार दिला होता. यानंतर, विजयने आपला खर्च भागवण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामे केली. या अभिनेत्याने प्रथम एका सर्वसाधारण दुकानात सेल्समन म्हणून काम केले, नंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशियर म्हणून आणि एका फोन बूथवर फोन ऑपरेटर म्हणून त्याने काम केले आहे.विजय सेतुपतीने मद्रासमधील एका महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी (B.COM) पूर्ण केली आणि त्यानंतर एका आठवड्यात त्याने घाऊक सिमेंट व्यवसायात अकाउंट्स असिस्टंट म्हणून नोकरी स्वीकारली. विजय त्याच्या तीन भावंडांची काळजी घेण्यासाठी दुबईला अकाउंटंट म्हणून काम करण्यासाठी गेला होता. जिथे त्याला भारताच्या तुलनेत चौपट पगार मिळत होता.दुबईमध्ये राहत असताना, विजयला 'जेसी' नावाच्या एका मुलीवर प्रेम झाले, जी त्याला ऑनलाइन भेटली. या जोडप्याने अनेक वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर अभिनेता २००३ मध्ये जेसीशी लग्न करण्यासाठी भारतात परतला. विजय आणि जेसी यांना सूर्या नावाचा मुलगा आणि श्रीजा नावाची मुलगी आहे. अभिनेत्याने त्याच्या दिवंगत शाळेतील मित्र 'सूर्य'च्या स्मरणार्थ त्याच्या मुलाचे नाव सूर्य ठेवले.विजयचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. पण एकदा एका प्रसिद्ध दक्षिण दिग्दर्शकाने त्याला पाहिले तेव्हा दिग्दर्शकाला विजयचा चेहरा फोटोजेनिक वाटला आणि त्याने त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अभिनेत्याने त्याला मिळालेल्या सल्ल्यानुसार चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले. २००६ ते २००९ पर्यंत, अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. २०१० मध्ये, दिग्दर्शक सीनू रामास्वामी यांनी त्यांच्या चित्रपटाच्या ऑडिशन्स दरम्यान विजयची दुशारी ओळखली आणि सेतुपती यांना 'थेनमेरकू परुवाकात्रू' या चित्रपटात पहिली मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.विजयने त्याच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यासाठी त्याला एक 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार', दोन 'फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण' आणि दोन 'तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार' यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१४ मध्ये, यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर, सेतुपतीने स्वतःच्या नावाने एक प्रॉडक्शन हाऊस उघडले. त्याची निर्मित केलेल्या ऑरेंज मिठाई या चित्रपटाला समीक्षकांची बरीच प्रशंसा मिळाली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lDVOY09
No comments:
Post a Comment