Breaking

Saturday, January 18, 2025

देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे धनुभाऊंचा पत्ता गुल, बीडमध्ये अजित दादांसमोर सर्वात मोठं आव्हान काय? https://ift.tt/b7Ukylu

दीपक जाधव, बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर पालकमंत्री पदासाठी धनंजय मुंडे यांना बीड पासून दूर ठेवा अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. याच मागणीला विरोधकांबरोबरच महायुतीतील आमदारांनी देखील पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच नव्हे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस अथवा अजित पवारांनीच स्वीकारावी अशी मागणी केली होती. शनिवार (१८ डिसेंबर) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. या यादीत अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलेले असून, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे असणार आहेत तर पंकजा मुंडे यांच्यावर आता जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असणार आहे. अजित पवार बीड सह पुणे जिल्ह्याची देखील जबाबदारी स्वीकारणार आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आता अजित पवार असल्याने त्यांच्याकडून आता बरीच अपेक्षा करण्यात येत आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील वाढलेल्या अपराधिक घटना रोखणे आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे अजित पवार यांच्या समोरील प्रमुख आव्हान असणार आहे. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याबद्दल बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.ज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचे नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु त्यांना मोठा विरोध होत होता. यामुळे आता अजित पवार बीडचे पालकत्व सांभाळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच तीन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.

धनंजय मुंडेंना धक्का

राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रिपद असणार आहे.

दादा बीडला कायमस्वरूपी अधिकारी द्या

बीड जिल्ह्यात अनेक वर्ग दोन चे पद हे रिक्त आहे, विशेषतः महसूल आणि ग्रामविकास विभागात अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाची संख्या ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. स्थानिक पातळीवरील एखाद्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला वर्ग 2 चा पदभार देऊन त्याकडून हवे तसे काम करून घेणे ही बीडच्या राजकारणाची पद्धत आहे. निदान अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम ते बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वर्ग दोनच्या सर्व रिक्त जागा ताबडतोब भरतील अशी अपेक्षा आता सामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष करून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गटशिक्षण अधिकारी पदे रिक्त आहे आणि अशा रिक्त पदांवर विस्ताराधिकाऱ्यांना बसून त्यांच्याकडून काम करून घेण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hQRK8A

No comments:

Post a Comment