नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अखेर लग्नबंधनात अडकला आहे. नीरज चोप्राने आपल्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने आपल्या पत्नीचं नावही संंगितलं आहे. नीरजची ही पोस्ट जगभरात चांगलीच व्हायरल झाली आहे. नीरज चोप्राने आपण लग्न करत असल्याचे कुठेही जाहीर केले नव्हते. पण नीरजने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली आणि आपण विवाहबद्ध झाल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली. नीरजची पत्नी आहे तरी कोण, याची उत्सुकता यावेळी सर्वांनाच होती. पण नीरजने आपल्या पत्नीचे नावही त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. नीरजने आपल्या पोस्टमध्ये लग्नकार्याचे फोटो अपलोड केले आहेत, जे जगभरात चांगलेच व्हायरल झालेले आहेत.नीरज चोप्रामुळे संपूर्ण जगाला भारताची दखल घ्यावी लागली होती. कारण ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी जे कधीच घडलं नव्हतं ते नीरज चोप्राने घडवून आणलं होतं. ऑलिम्पिकसारख्या महा क्रीडामेळ्यात नीरजने भारताला ॲथलेटीक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. भालाफेक या प्रकारात यापूर्वी कोणताही भारताचा खेळाडू एवढ्या मोठ्या स्तरावर कधीच गेला नव्हता. पण नीरजने पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि इतिहास रचला होता.नीरज प्रथमच २०२० साली ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. या ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी नीरज चोप्रा कोण आहे, बऱ्याच जणांना माहिती नव्हते. पण नीरज चोप्राने २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि संपूर्ण जगाने त्याच्यासह भारताची दखल घेतली. नीरजला खरी ओळख या सुवर्णपदकाने दिली. त्यामुळे नीरज चोप्रा आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा सुवर्णपदक जिंकणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. नीरज २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दाखल झाला तो सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न घेऊन. नीरजने जर यावेळी सुवर्णपदक जिंकले असते तर तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला असता. पण या २०२४ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरजचे सुवर्पदक हुकले आणि त्याला रौप्यपदकावर यावेळी समाधान मानावे लागले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zMp6Zsv
No comments:
Post a Comment