दीपक पडकर, बारामती : ठिकठिकाणी अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. पुण्यासह बारामती सारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने खून करणे, खूनी हल्ला करणे, दहशत माजविणे आदी गंभीर प्रकार वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अल्पवयीनांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करण्यासंदर्भात पवारांनी बारामतीत संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोयता प्रकरणातील गुन्ह्यात अनेकदा अल्पवयीन मुले असतात. त्यांच्यावर कठोर शासन करता येत नाही. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून सांगितले आहे की, अलीकडे 13 ते 14 वर्षाच्या मुलांना चुकीच्या पद्धतीने भडकवून, चुकीची कामे करायला काही जण भाग पाडतात. अशावेळी त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. जेलमध्ये टाकता येत नाही. त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं..! तेथे त्यांना मोठी शिक्षा करता येत नाही. त्यामुळे 14 वयाच्या मुलाने जरी अशा स्वरूपाचे गुन्हे केले तर त्यांनाही कडक शासन झाले पाहिजे. असे प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रविवारी बारामतीत सांगितले.
पोलिसांना केल्या सूचना
बारामतीतील पणदरे या ठिकाणी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एकमेकांकडे बघण्यावरून नुकताच वाद झाला होता. त्या वादाचे रूपांतर थेट कोयत्याने हल्ला करण्यापर्यंत पोहोचला. याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दखल घेतली असून, पोलिसांना सूचना केल्या आहेत. तसेच आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे, तो काय करतो? याकडेही पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या बॉर्डरवर चुकीचा वापर सुरू
ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या बॉर्डरवर चुकीचा वापर सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान मधून भारतात अमली पदार्थ पाठविले जातात. विशेषता रात्री या 'ड्रोन'चा वापर केला जातो. नवीन पिढी अमली पदार्थाच्या आहारी जाण्यासाठी शत्रु राष्ट्रांचे हे प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. तसेच यासाठी दोन 'अँटी ड्रोन गन' पुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. पैकी एक बारामतीसाठी दिली आहे. एक किलोमीटर अंतरावरील संशयित 'ड्रोन' पाडण्याची क्षमता या 'ड्रोन' मध्ये असल्याचे पवारांनी सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AZPdkc3
No comments:
Post a Comment