Breaking

Saturday, January 25, 2025

श्री आणि सौ स्पर्धेत कोण ठरणार विजेते ? जानकी ऋषिकेशला शह द्यायला ऐश्वर्याने आधीच केलाय मोठा कांड https://ift.tt/uh4PG5Z

मुंबई- स्टार प्रवाहच्या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत लवकरच श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये मुळशी मधील अनेक उद्योजक सामील होणार असून जानकी - ऋषिकेश, ऐश्वर्या - सारंग आणि अवंतिका - सौमित्र देखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या जोडीला २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुळशी मध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.श्री आणि सौ स्पर्धेत वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. मात्र ते टास्क कोणते असतील याची कल्पना मात्र ऐनवेळी देण्यात येणार असल्यामुळे स्पर्धा नक्कीच आव्हानात्मक असेल. पहिली फेरी असणार आहे पाककला स्पर्धा. जानकी सुगरण आहेच मात्र ही फेरी जानकी जिंकू नये म्हणून ऐश्वर्याने पूर्ण बंदोबस्त केला आहे. त्यामुळे श्री आणि सौ स्पर्धेची पहिली फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.हा खास प्रसंग शूट करण्यासाठी कलाकारांसोबतच मालिकेची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. भर उन्हात शूट करण्याचं आव्हान तर होतंच पण त्यासोबत संवाद पाठ करता करता पदार्थ बनवण्याचीही कसरत सुरु होती. दिग्दर्शक राहुल लिंगायत यांनी उत्तमरित्या हा सीन कलाकारांना समजावला आणि हा सीन साकारण्यासाठी कलाकारांनीही कंबर कसली.मालिकेमध्ये ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यात आल्यापासून ती त्यांना सतत शह देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. सौमित्रशी लग्न न झाल्याचा बदला ती अख्ख्या घराला सतावून घेत असते. पण जानकी दरवेळी खमकी राहून तिला जशासतसं उत्तर देते. ऐश्वर्याने चालाखीने जानकीला जरी घराबाहेर काढलं असतं तरी घरातल्या इतरांना हळूहळू जानकीचं महत्व पटू लागलं आहे. या सर्वात फक्त सारंगच्या डोळ्यांनाच पट्टी आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सारंगचे डोळे उघडतील का? श्री आणि सौ स्पर्धा कोण जिंकणार या सर्व प्रश्नांची उत्तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहायला मिळणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/taIv4bh

No comments:

Post a Comment