Breaking

Saturday, January 11, 2025

भारताचा कर्णधार नाही तर उपकर्णधार बदलला, इंग्लंडच्या मालिकेपूर्वी हार्दिकलाही मोठा धक्का https://ift.tt/e38mpgX

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीचे या संघात पुनरामगन झाले, हा पहिला मोठा बदल आहे. भारतीय संघात दुसरा बदल हा नेतृत्वाच्या रुपात झाला आहे.

गंभीर यांची सर्वात वेगळीच रणनिती

भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघाची निवड करताना यावेळी एक वेगळीच रणनिती आखल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण जेव्हा समोर आला तेव्हा भारताचा कर्णधार नाही तर उप कर्णधार यावेळी बदलल्याचे पाहायला मिळाले. हा एक मोठा बदल करत गंभीर यांनी हार्दिक पंड्यालाही धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

गौतम गंभीर यांनी नेमकं केलं तरी काय...

भारतीय संघाची जेव्हा निवड झाली तेव्हा हा सर्वात मोठा बदल लगेच समजण्यात आला नाही. पण भारतीय संघात हा बदल मोठ्या शिफातीने करण्यात आला आहे. कारण आता भारतीय संघाचा कर्णधार जरी सूर्यकुमार यादव असला तरी उप कर्णधार मात्र बदलेला आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह किंवा ऋषभ पंत या दोघांपैकी एकाकडे उप कर्णधारपद असायचे. पण या दोघांचाही यावेळी संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघाचे उप कर्णधारपद यावेळी अक्षर पटेलला देण्यात आले आहे.

हार्दिकला कसा दिला धक्का...

हार्दिक पंड्यासाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे. कारण सूर्या हा कर्णधार म्हणून कायम असला तरी उप कर्णधाराची निवड करण्यासाठी हार्दिक सोडल्यास दुसरा अनुभवी खेळाडू संघात नव्हता. त्यामुळे हार्दिकला यावेळी उप कर्णधारपद देण्यात येईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण यावेळी हार्दिकला उप कर्णधारपदी न देता, त्याला मोठा धक्का दिला आहे.इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना भारतीय संघात उप कर्णधार बदलणे हा मोठा निर्णय असेल. कारण आता अक्षर पटेलला संघाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये सामील केले जाईल, तर हार्दिकला मात्र महत्वाचे निर्णय घेण्यापासून दूर ठेवले जाईल. त्यामुळे गंभीर यांची ही वेगळी चाल, चाहत्यांच्या मात्र लवकर लक्षात आलेली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9CSZi2u

No comments:

Post a Comment