Breaking

Wednesday, October 9, 2024

मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, अन्यथा तुम्ही मंत्री असता; मात्र काळजी करू नका; हा बॅकलॉग भरुन काढू- मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द https://ift.tt/uUDIn73

कोल्हापूर (नयन यादवाड) : सभास्थळी येताना धामणी प्रकल्पाला गेलो होतो. हजारो लोक धामणी प्रकल्पामध्ये पावसात वाट बघत थांबले होते. चेहऱ्यावरील लोकांचं समाधान पाहून मला आनंद झाला. आबिटकर आमदार झाल्यापासून येतात विकास कामासाठी निधी नेतात मात्र विकास कामांचं उद्घाटन कधी करतात, असे मला वाटत होत. मात्र प्रकाश आबिटकर यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा बॅकलॉग आजच भरून काढला. हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल याचे नियोजन यांनी केला आहे. आमदार कसा असावा तो प्रकाश आबिटकर सारखा असावा, असे म्हणत यांनी आबिटकर यांचं तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच राज्यात आमचा मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला, जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर आबीटकर मंत्रिमंडळात असते. मात्र काळजी करू नका; हा बॅकलॉग भरुन काढू, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. ते आज गारगोटी आणि धामणी येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.प्रकाश आबिटकर यांचा तोंड भरून कौतुकराधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या धामणी शुभारंभ देखील करण्यात आला त्यानंतर गारगोटी येथील विविध शासकीय कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांचा तोंड भरून कौतुक केले. आम्ही उठाव केला त्यावेळेस प्रकाश आबिटकर आमच्या सोबत आले होते. त्यावेळी मी तुम्हाला काय हवं असं विचारलं होतं. मात्र त्यांनी मला जे जे काम सांगितल ते सर्व तुमच्या मतदारांचा सांगितले. इतर वेळी अनेक आमदार मला भेटायला येतात, मात्र काम असेल तरच आबिटकर मला भेटतात. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊदेराधानगरीचे आमदार प्रकाश अबिटकर उमदा लीडर आहे, मी त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना जे हवं ते द्या, असं सांगितलं होतं. मात्र हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी सदैव कटिबद्ध आहे. राज्यातील महायुतीने गेल्या अडीच वर्षात केलेलं काम आणि महाविकास आघाडीचे सरकार असताना झालेलं काम याचं मोजमाप होऊ द्या, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी जनतेच्या दरबारातच होईल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला. आमच्या बहिणीच्या लहान मुलांचा घास हिरावता का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून 80 हजार फॉर्म भरले आहेत. कोणाच्या खात्यावरती पैसे जमा व्हायचे राहिले असतील तर तेही जमा होतील हा शब्द तुमच्या भावाचा आहे. आमच्या या योजनामुळे कोणाला मळमळ.. उलट्या सुरू झाल्या त्यानंतर अनेक जण ही योजना फसवी आहे खोटी आहे असं सांगितलं गेलं. हे सरकार देणार आहे घेणार नाही. या योजनेच्या विरोधात कोर्टातही अनेक लोक गेले.आमच्या बहिणीच्या लहान मुलांचा घास हिरावता का. सर्वसामान्य कुटुंबाला दीड हजार रुपयांचा हातभार लावण्याचा प्रयत्न केला तर तुमचं काय जातंय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडा सवाल विचारला आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अजून आशीर्वाद दिले तर या योजनेचे रक्कम तीन हजार करणार आत्ता पर्यंत इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना याच सरकारने आणल्या असल्याचं ही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/dRlheSD

No comments:

Post a Comment