Breaking

Thursday, January 23, 2025

छोटा राजनचा हस्तक डी. के. राव अटकेत, मोठी कारवाई https://ift.tt/FsiTAdq

मुंबई : छोटा राजनचा हस्तक गँगस्टर रवी मल्लेश बोरा ऊर्फ डी. के. राव आणि त्याच्या सहा साथीदारांना बुधवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. हॉटेलचा ताबा सोडावा आणि अडीच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप राव आणि त्याच्या टोळीवर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून १९७२ मध्ये त्यांनी मरोळ नाका येथे भूखंड विकत घेऊन त्यावर एम्पायर इंजिनीअरिंग नावाची कंपनी स्थापन केली.छोटा राजनचा हस्तक अटकेत त्यानंतर २०१६ मध्ये केरळला राहणारे अब्दुल्ला अबू याने या जागेत निवासी हॉटेल बांधण्याचा सल्ला दिला. तसेच हॉटेल बांधण्यासाठी येणारा सर्व खर्च अबू करेल, हॉटेल बांधून पूर्ण झाले की तीन गाळे तक्रारदाराला मिळतील, उर्वरित बांधकामाचा व्यवसायिक वापर अबू करेल, त्यापोटी ५० लाख रुपये अबू तक्रारदाराला देईल असा करार करण्यात आला होता.आगाऊ रक्कम आणि भाडे देणे टाळलेबांधकाम पूर्ण झाल्यावर अबू आणि त्याच्या मुलाने करार मोडला. हॉटेल चालविण्यास घेतले.मात्र, आगाऊ रक्कम आणि भाडे देणे टाळले. कारोना काळात त्यांनी तक्रारदाराला बाहेर काढून हॉटेल कब्जात घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली .त्यानंतर त्यांनी हॉटेल विकण्यास आणि त्यातील ७५ टक्के रक्कम देण्यास तक्रारदारावर दबाव आणला. हा वाद मिटविण्यासाठी आरोपींनी हॉटेल सहारा स्टार येथे एक बैठक घेतली. त्यात तक्रारदाराचे प्रतिनिधी मुख्तार शेख उपस्थित होते.आरोपींची हॉटेल सहारा स्टार येथे एक बैठक या बैठकीला राव उपस्थित होता. त्याने हा विषय लवकरात लवकर मिटवा, हॉटेल विका आणि मला अडीच कोटी रुपये खंडणी द्या अन्यथा तक्रारदाराची हत्या करू, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून गुन्हा दाखल करीत डी. के. राव आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांकडून ही मोठी कारवाई करवाई करण्यात आल्याचे आता बोलले जातंय. डी. के. राव हा हस्तक आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AlFUGzS

No comments:

Post a Comment