मुंबई : जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल. जेवढे अंगावर याल तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी इशारा दिला. वेळ आल्यावर शिवसैनिक रक्तदान करतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गोमूत्र वाटतील अशा शब्दांत त्यांनी संघालाही फटकारले. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी वेळ आल्यावर सैनिकांच्या मनाप्रमाणे एकटे लढण्याचा निर्णय घेईन, असेही त्यांनी जाहीर करीत मविआवरही टांगती तलवार ठेवली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमित शहा, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला, तो मला पटला नाही असे सांगत जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा ‘किस झाड की पत्ती’ आहे अशी घणाघाती टीका ठाकरेंनी शहांवर केली. लोकसभेनंतर आपण भ्रमात राहिलो हे आपण सत्य मान्य करायल हवे. ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार भाजपने केला. मुंबईतील दंगलीसाठी मी मुस्लिम धर्मियांची माफी मागितल्याचाही कांगावा करण्यात आला. मात्र माफी मी नाही, तर अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती. इट वॉज टेरिबल मिस्टेक असे लालकृष्ण अडवाणी बोलले होते. त्यामुळे आता शहांनी याबाबत अडवाणींनी विचारावे, असेही ते म्हणाले. वांद्र्याला गद्दाराचा मेळावा सुरू आहे. गद्दार जिंकले असले तरी महापालिका निवडणूक होऊन जाऊ द्या, मग गद्दारांना त्यांची जागा दाखवली जाईल, अशी टीका एकनाथ शिंदेंवर केली. 'तुमची जागा काय होती, हे पाहा' 'माझी जागा ठरवताना, तुमची जागा काय होती, त्यातून बाळासोहबांनी कसे बाहेर काढले, हे पाहा,' असेही उद्धव शहा यांना म्हणाले. भाजपने गुजरातमधून ९० हजार लोक आणल्याचे विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. यावर 'ते लोक कुठे गेले आहेत ते विचारा,' असा टोला त्यांनी लगावला
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0pIJstG
No comments:
Post a Comment