मुंबई- मराठीतला सुपरस्टार श्रेयस तळपदेचा आज २७ जानेवारी रोजी त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी मालिका आणि स्टेज शोमधून केली होती. आज त्याची गणना केवळ मराठीतल्याच नव्हे तर हिंदीतल्याही टॉप स्टार्समध्ये होते. पण श्रेयस तळपदेचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. श्रेयस तळपदेने गेल्या २० वर्षांपासून अभिनय करत आहे. दिग्दर्शनापासून ते निर्मिती आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टसारखी बरीच कामे त्याने केली आहेत. कोणत्याही गॉडफादर किंवा सिनेसृष्टीतल्या मोठ्या व्यक्तींशी संबंध न ठेवता स्वतःच्या बळावर स्वतःचे नाव कमावणाऱ्या श्रेयसची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. गॉडफादरशिवाय ओळख निर्माण श्रेयस तळपदेचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील अभिनेत्री मीना टी आणि जयश्री टी यांचे भाऊ होते. पण तरीही श्रेयसचे चित्रपट जगात कोणतेही मजबूत कनेक्शन नव्हते. श्रेयसने जे काही साध्य केले ते त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणातून केले आहे. एका मुलाखतीत श्रेयस तळपदे म्हणाला होता की त्याने त्याच्या कारकिर्दीत कधीही करण जोहर किंवा यशराजच्या चित्रपटात काम केले नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो एक सक्षम अभिनेता नाहीये. मोठे बॅनर्ससोबत नसले तरी, मी मोठ्या स्टार्ससोबत काम केले. श्रेयस तळपदेने त्याच्या कारकिर्दीत नसीरुद्दीन शाह, अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, फराह खान आणि रोहित शेट्टी सारख्या सेलिब्रिटींसोबत काम केले. सँडविच खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते श्रेयस तळपदेच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे सँडविच खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. पण आज तो कोट्यवधींमध्ये कमाई करत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी २-३ कोटी रुपये घेतो. २०२० मध्ये 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदे याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. 'माझ्याकडे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. माझ्याकडे सँडविच खरेदी करण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. एवढेच काय तर, माझ्याकडे स्टुडिओला बसने जाण्यासाठीही पैसे नव्हते. 'सर्वकाही स्वतःहून करण्याचा अनुभव कसा असतो हे या इंडिस्ट्रीतल्या मुलांना कधीच कळणार नाही.' त्यांना त्यांचे विशेषाधिकार असू द्या. मला वाईट वाटते की त्यांचा प्रवास आमच्यासारखा सुंदर नाही. श्रेयसने असेही म्हटले होते की घराणेशाही आणि पक्षपात नेहमीच सगळीकडे असतो. पण पुढे जाताना, आपण फक्त त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी कधीही करण जोहर किंवा यशराजचा चित्रपट केलेला नाही. मी कधीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि त्यानेही माझ्यासोबत काम करण्यास रस दाखवला नाही. पण याचा अर्थ असा नाही की माझी कारकीर्द संपली आहे. श्रेयसने 'द लायन किंग' मध्येही आवाज दिला आहे. श्रेयस तळपदे याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 'इकबाल', 'वेलकम टू सज्जनपूर', 'आशायें', 'गोलमाल सिरीज' आणि इतर काही चित्रपटांनी त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन आयाम दिला. अभिनयाव्यतिरिक्त, श्रेयसने आवाजही दिला आहे. याशिवाय त्याने द लायन किंग आणि पुष्पा यांसारख्या सिनेमांना आपला आवज दिला आहे. श्रेयसची माझी तुझी रेशीमगाठ ही मराठी मालिका सुपरहिट झाली होती. या मालिकेत तो अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत दिसला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PALcJoV
No comments:
Post a Comment