Breaking

Sunday, January 26, 2025

१ रुपयाच्या त्या गोष्टीची चोरी जितूला पडलेली भारी! घरी येताच आईच्या चपला अन् मामाच्या बेल्टनं खाल्लेला मार https://ift.tt/iqr9dfT

मुंबई- मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्यांच्या फळीमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी याचे आवर्जून नाव घेतले जाते. जितेंद्र जोशी आज २७ जानेवारी रोजी त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जितेंद्र जोशी यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. तो सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असतो. आपली मतं अगदी परखडपणे तो मांडतो. जितेंद्र ने काही महिन्यांपूर्वी श्रेयस तळपदेच्या पॉडकास्ट वर त्याने केलेल्या पहिल्या चोरीचा किस्सा शेअर केला होता. जितेंद्र म्हणाला की, मी एकदा अमिताभ बच्चन साहेबांचा फोटो चोरला. ते मी घरी सांगितलं नाही पण कुठून तरी ते कळलंच आणि मला खूप मार पडला. जितेंद्र यांनी किस्सा शेअर करताना सांगितले की मी लहान असताना मित्रांसोबत स्विमिंगला गेलेलो. तिथे बच्चन साहेबांचा दिवार सिनेमातला फोटो विकायला ठेवलेला. मी त्या विक्रेत्याला फोटोची किंमत विचारली तेव्हा त्याने एक रुपया सांगितलं. तो त्या वेळेचा एक रुपया होता.... मी त्या दिवसापर्यंत आयुष्यात कधीच चोरी केली नव्हती. पण मित्र मला म्हणाला काही नाही रे इकडे तिकडे बघायचं आणि गपचूप फोटो उचलायचा! मला त्याची कल्पना आवडली आणि त्या विक्रेत्याचे लक्ष नसतानाच मी तो फोटो पटकन उचलला. पण नेमकं त्या विक्रेत्याने बघितला आणि तो मला ओरडायला लागला की हे काय करतोयस... वगैरे वगैरे. मी तो फोटो घेऊन पार धूम ठोकली होती. मला ते जाम भारी वाटत होतं की मी काहीतरी मोठा केला आहे. गल्याबोळ्यातून मी घराच्या दिशेने पळू लागलेलो. मागे बघितलं तर तो विक्रेता नव्हता. पुढे घरी आल्यावर मी तो फोटो दाखवला आणि सांगितलं एका मित्राने मला हा फोटो दिला आहे. मी समोरच्या वाड्यात सुद्धा तो फोटो दाखवायला गेलो आणि अचानक मला खालून आवाज यायला लागला. पाहतो तर काय तो विक्रेता माझ्या घरी येऊन पोहोचला होता आणि जोर जोरात आवाज चालू होता. मी त्या विक्रेत्याला ओळखत नव्हतो पण तो विक्रेता मला चांगला ओळखत होता. त्यामुळे तो माझ्या घरी येऊन माझी तक्रार करत होता. मग मला आईच्या चपला आणि मामाचा बेल्टचा मार चांगलाच पडला होता आणि मग मी वेळीच या वाईट सवयी करायच्या थांबलो. जितेंद्र जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत काकण, गोदावरी, दुनियादारी, चोरीचा मामला, तुकाराम, बाजी, व्हेंटिलेटर, पोस्टर गर्ल, नटसम्राट यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/COysSXK

No comments:

Post a Comment