नवी दिल्ली : केळी शेती हा एक फायदेशीर व्यवहार मानला जातो. परंतु, त्याच्या झाडाचे देठ अनेकदा कचरा समजून फेकून दिले जाते, जे प्रत्यक्षात खजिन्यापेक्षा कमी नाही. निरुपयोगी समजले जाणारे हेच देठ उत्पन्न वाढवण्याचे उत्तम साधन बनू शकतात, याची कल्पना कधी केली आहे का? आंध्र प्रदेशातील एका जोडप्याने हीच कल्पना खरी ठरवली आहे. पुलगुरा श्रीनिवासुलू आणि चेनू आनंदकुमारी या कुड्डापाह जिल्ह्यातील जोडप्याने केळीच्या कचऱ्यापासून पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्याचा एक अनोखा आणि फायदेशीर मार्ग शोधून काढला आहे. नवभारत टाईम्सशी बोलताना चेनू आनंदकुमारीने सांगितले की, कोविड-19 महामारीच्या काळात तिला ही कल्पना सुचली होती. दोघांनीही नोकरी सोडून त्या संकल्पनेवर काम सुरू केले आणि सुमारे दीड वर्षे त्यांनी यावर व्यापक असे संशोधन केले. नंतर पती-पत्नीच्या प्रयत्नांना अखेर फळ मिळाले आणि सप्टेंबर २०२२ मध्ये श्रीनिवासुलू आणि आनंदकुमारी यांनी 'मुसा फिब्रल' नावाचा स्टार्टअप सुरू केला. पती-पत्नी पुढे आपल्या व्यवसायात सातत्य ठेवले आणि आंध्र प्रदेशातील केळीचे पहिले फायबर उत्पादक बनण्याचा मान पटकावला आहे. श्रीनिवासुलु आणि आनंदकुमारी यांनी केळीच्या देठापासून 25 हून अधिक प्रकारची जैवविघटनशील उत्पादने बनवली आहेत. या उत्पादनांमध्ये हस्तकला, कागद, पुठ्ठा, जैव-खते, विक्स, कटलरी, खेळणी, सॅनिटरी नॅपकिन्स आणि घर सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व उत्पादनांसाठी ते स्टार्टअप म्हणून नैसर्गिक अशा केळीच्या खोडाचा वापर करतात.अशा प्रकारे केळीच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा ते पुरेपूर वापर करतात. तथापि, त्यांना आता जे यश मिळालंय ते साधणे सोपे नव्हते, येथे पोहचण्यासाठी त्यांना स्टार्टअपसाठी खूप संशोधन करावे लागले. आनंदकुमारी सांगतात की, आम्ही केळीच्या देठापासून आणि पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून कपडे तयार करत आहोत. नैसर्गिक तंतूपासून बनवलेले कापड- 'नारा वस्त्रलू' यामध्ये परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण आहे.तर नैसर्गिक देठाच्या व्यवसायाचा जागतिक स्तरावर विस्तार करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे आनंदकुमारी सांगतात. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उत्पादनांमध्ये या तंतूंच्या वापराला प्रोत्साहन देऊन पर्यावरण वाचवण्याचा संदेशही दिला जात आहे. 'केळीच्या देठाची उत्पादनं शेतातून घरापर्यंत पोहोचवायचे आहेत, जेणेकरून लोकांना निसर्गाचे महत्त्व समजेल.' हा देखील त्यांचा यामागील हेतू असल्याचे त्या सांगतात. श्रीनिवासुलू आणि आनंदकुमारी त्यांच्या व्यवसायात १४०० हून अधिक शेतकऱ्यांसोबत काम करत आहेत. हे दोघेही या शेतकऱ्यांकडून केळीचे देठ विकत घेतात, जे टाकाऊ समजले गेले आणि फेकून दिले गेले आहे. याशिवाय, आनंदकुमारी आणि त्यांचे पती ग्रामीण महिलांना केळीच्या देठापासून उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षणही देत आहेत. केळीच्या देठापासून उत्पादने बनवण्यासाठी त्याच्या टीममध्ये ५० ते ६० महिला काम करत आहेत.आनंद कुमारी यांच्या स्टार्टअपमध्ये सामील होऊन या महिला केवळ सक्षम होत नाहीत तर त्यांच्या उत्पन्नातही भर पडत आहे. या स्टार्टअपने आतापर्यंत राज्यात केळीचे तंतू काढण्याचे ११ युनिट्स उभारले गेले आहेत. पती-पत्नीच्या प्रयत्नांचा प्रभाव आता दूरवर पोहोचल्याचे चित्र आहे. पती-पत्नीने त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या लेपाक्षी हस्तकला एम्पोरियमशी करार केला आहे.लेपाक्षीशी करार झाल्यानंतर त्यांची उत्पादने उपमुख्यमंत्री पवन कल्याणपर्यंत पोहोचली आहेत. त्याच वेळी, अनिवासी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी देखील त्यांच्या टिकाऊ उत्पादनांमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामुळे केळीच्या तंतूची उपलब्धता आणखी वाढली आहे. महाकुंभ मेळा, भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम आणि विजयवाडा टेक्सटाईल कॉन्फरन्स यांसारख्या प्रमुख व्यासपीठांवरही या जोडप्याचे पर्यावरणपूरक प्रयत्न प्रदर्शित केले गेले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E5txOTg
No comments:
Post a Comment