बीड: पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे हे बीडच्या वाहतूक शाखेत कार्यरत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी बीडच्या पोलीस प्रेस ग्रुप वरती हजाराची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार अशी पोस्ट केली होती. यानंतर बजरंग सोनावणे यांनी अधिकारी जर असं वागत असतील आणि एक लोकप्रतिनिधीला ओपन चॅलेंज देत असतील तर त्यांची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती. यानंतर वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांची पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. 'बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही', असं म्हणत खासदार बजरंग सोनावणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे असं बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचं बोललं जात आहे. गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या पोलीस अधिकाऱ्यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने त्यांना बीड जिल्ह्यातून हटवले असून त्यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बीड पोलिसांचा एक अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बजरंग सोनावणे यांनीही याबाबत भाष्य केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर बजरंग सोनावणे यांनी या पोलीस अधिकाऱ्याचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करावेत, अशी मागणी केली होती.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ey3earG
No comments:
Post a Comment