मुंबई : विनोद कांबळी आता हॉस्पिटलमधून घरी दाखल झाला आहे. आता भराताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळीला भेटून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यासाठी आता कपिल देव यांनी एक अट ठेवल्याचे समोर आले आहे.
कपिल देव यांनी मदतीची तयारी दाखवली होती...
विनोद कांबळीचा रमाकांत आचरेकर सरांच्या कार्यक्रमातील व्हिडिओ पाहून कपिल देव व्यतिथ झाले होते. विनोदची तेव्हा फारच वाईट अवस्था पाहायला मिळत होती. विनोदचा त्यावेळी सचिन तेंडुलकरबरोबरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी विनोदची प्रकृती ढासळलेली पाहायला मिळत होती. त्यानंतर कपिल देव यांनी आपण विनोद कांबळीला मदत करणर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता ते विनोद कांबळीला भेटण्यासाठीही तयार झालेले आहेत.कपिल यांनी विनोद हॉस्पिटलमध्ये असताना साधला संवाद...
विनोद कांबळीची प्रकृती त्यानंतर बिघडली होती. विनोदला चालताही येत नव्हते आणि त्याला चक्कर येत होती. त्यावेळी विनोद कांबळीला ठाण्यातील आकृती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद काही दिवस या हॉस्पिटलमध्ये होता. विनोदवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यावेळी कपिल देव यांनी विनोदशी फोनवरून संवाद साधला होता. कपिल देव विनोदला म्हणाले की, " तु आता पूर्वीपेक्षा उत्तम दिसत आहेस. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पूर्ण उपचार घेतल्याशिवाय तु घरी जाऊ नको. मी तुला भेटायला येणार आहे. पण त्यासाठी आधी तू पूर्णपणे फिट व्हायला हवास. "कपिल देव यांवी कोणती अट ठेवली...
कपिल देव यांनी विनोदला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कपिल देव विनोद कांबळीला भेटून त्याची विचारपूस करणार आहेत आणि त्याला मदतही करणार आहेत. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. कपिल देव हे विनोद कांबळीला भेटायला तेव्हाच येतील जेव्हा तो पूर्णपणे फिट होईल. विनोद कांबळी आता फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरच तो फिट होईल, अशी सर्वांना आशा आहे. त्यानंतर विनोद कांबळीला भेटण्यासाठी कपिल देव येणार आहेत.विनोद कांबळीच्या तब्येतीमध्ये आता चांगलीच सुधारणा दिसलेली आहे. त्यामुळे विनोद यापुढे स्वत: कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष नक्कीच लागलेले असेल. विनोदने बरेच वाईट दिवस पाहिलेले आहेत. पण आता त्याचे वाईट दिवस सरले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कपिल देव आणि विनोद कांबळी यांची भेट कधी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nzlakF8
No comments:
Post a Comment