Breaking

Thursday, January 2, 2025

विनोद कांबळीवर आली घर गमावण्याची वेळ, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर वेगळंच प्रकरण आलं समोर https://ift.tt/RIGFONS

मुंबई : विनोद कांबळीची तब्येत सुधारली. विनोदला हॉस्पिटलमधून घर पाठवण्यात आले. पण ज्या घरात तो राहायला गेला तेच घर गमावण्याची वेळ आता त्याच्यावर आली आहे. कारण हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आता एक वेगळच प्रकरण सर्वांसमोर आले आहे.

विनोद कांबळीसमोर कोण कोणत्या समस्या...

विनोद कांबळी सध्याच्या घडीला जास्त काही कमावत नाही. बीसीसीआयची ३० हजार रुपयांची पेंशन त्याला मिळते. एकिकडे उपचारांचा खर्च, दुसरीकडे मुलांचे शिक्षण आणि आता राहत्या घराचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. कारण विनोद कांबळीला आता त्याचे राहते घर गमवावे लागू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

विनोद कांबळीला घर का गमवावे लागू शकते...

विनोद कांबळी हा वांद्रे येथील घरात राहतो, अशी माहिती समोर येत आहे. जेव्हा विनोदने हे घर घेतले होते, तेव्हा या घराची किंमत दोन कोटी रुपये होती. या घरासाठी विनोदने कर्ज काढले होते, ते कर्ज विनोदने फेडले असल्याची माहितीही समोर आली होती. पण आता एक वेगळीच समस्या समोर आली आह. विनोद कांबळीने आपल्या घराचा मेंटेनन्स भरलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

विनोद कांबळीला घर वाचवण्यासाठी काय करावे लागेल...

विनोद कांबळीची कांबळीने २८ लाख रुपयांचे घरभाडे भरलेले नाही, असे समोर आले होते. पण याबाबत विनोदची पत्नी अँड्रीया हिने खुलासा करत सांगितले की, अजून १८ लाख रुपये थकलेले आहेत. काही दिवसांपूर्वी विनोद उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत केल्याचे समोर आले होते. पण तरीही अजून विनोदला १३ लाख रुपये भरावे लागणार आहेत. जर विनोदने हे १३ लाख रुपये भरले नाही, तर त्याच्यावर घर गमावण्याची वेळ येऊ शकते.

विनोदच्या प्रकृतीत कशी सुधारणा झााली आहे...

विनोद कांबळीला काही दिवसांपूर्वी ठाण्याचा आकृती हॉस्पिटलमध्ये देखल केले होते. विनोदची तेव्हा वाईट अवस्था होती. त्याला चालायलाही येत नव्हते. पण हॉस्टिपमलधून उपचार घेतल्यावर तो आपल्या पायावर ठणठणीत होऊन घरी परतला. पण त्यानंतर आता विनोदसमोर आता एक मोठी समस्या येऊन समोर ठेपली आहे. ही मोठी समस्या म्हणजे आता विनोदला आपले राहते घर गमवावे लागू शकते, अशी माहिती समोर आली आहे.विनोद कांबळी आता आपलं घर वाचवण्यासाठी नेमकं करतो तरी काय, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असेल. विनोदचे घर वाचवण्यााठी त्याला आता कोणी मदतीचा हात पुढे करतं की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TgGsrm9

No comments:

Post a Comment