Breaking

Saturday, January 4, 2025

कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते, तेवढ्यात दातात चाकूचा तुकडा अडकला अन्... https://ift.tt/SJUrXtL

पिंपरी-चिंचवड: पिझ्झामध्ये अक्षरशः चाकुचा तुटलेला तुकडा आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. येथील डॉमिनोज मध्ये अक्षरशः चाकुचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. शुक्रवारी (३ जानेवारी २०२५) रात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कुठली मोठी दुखापत झाली नसली तरी हा निष्काळजीपणा कुणाच्या जीवावर बेतू शकतो, अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली आहे.

कापसे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवड भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी शुक्रवारी रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा स्टोअर मधून ५९६ रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला आणि कुटुंबीय खूप घाबरले. काही क्षण त्यांना कळालंच नाही की काय घडलं. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की आपल्या दातात चाकूचा तुकडा घुसला आहे तेव्हा त्यांना धक्काच बसला. अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, सुरुवातीला त्यांना डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली. मात्र, मॅनेजरने घरी येऊन पिझातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला. या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झाविरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sGtCaPi

No comments:

Post a Comment