Breaking

Tuesday, January 21, 2025

उपकर्णधार झाल्यावर अक्षर पटेलने खरी गोष्ट सांगितली, म्हणाला संघात कोणाचे स्थान.. https://ift.tt/TsjIYrA

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर भारताचा संघघ प्रथमच मैदानात उतरत आहे. यावेळी भारतीय संघातील परिस्थिती आहे तरी कशी, भारतीय संघात कोणाचे स्थान निश्चित आहे, याबाबतची खरी माहिती आता अक्षर पटेलनन उपकर्णधार झाल्यावर सांगितली आहे.'भारतीय टी-२० संघातील फलंदाजीची क्रमवारी निश्चित नसेल. सलामीवीर निश्चित असले, तरी त्यानंतरच्या फलंदाजांच्या क्रमवारीत परिस्थितीनुसार बदल होईल,' असे भारतीय संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलने सोमवारी स्पष्ट केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिका बुधवारी कोलकाता येथे सुरू होणार आहे.'केवळ माझाच फलंदाजीचा क्रमांक बदलला नाही. याबाबत संघात २०२३-२४च्या सुरुवातीस चर्चा झाली होती. त्यानुसार सलामीवीर निश्चित असतील; पण तीन ते सात क्रमांकावरील फलंदाज कुठेही खेळू शकतात. कोणत्याही फलंदाजांचा क्रमांक निश्चित नसेल. सामन्यातील परिस्थितीनुसार त्यात बदल होईल. गोलंदाज कोण आहेत, धावांची सरासरी काय आहे, हा सर्व विचार होईल,' असे अक्षरने स्पष्ट केले.'संघातील सर्वच फलंदाज 'फ्लोटर्स' कसे असतील, याची आम्ही कायम चर्चा करतो. कधी डावाच्या सुरुवातीस यावे लागेल, तर कधी डावातील अखेरची षटके खेळण्याची जबाबदारी असेल. हे केवळ माझ्याच बाबतीत नाही, तर तिसऱ्या क्रमांकापासूनच्या सर्वांसाठी असेल. फलंदाजास चांगला सूर गवसला असेल, तर त्यांच्या क्रमवारीत आवश्यकतेनुसार बदल करणे आवश्यक ठरते. टी-२०मध्ये फलंदाजांचा कसा वापर करता यावर खूप काही निर्णायक असते,' असे अक्षर म्हणाला.काही महिन्यांपासून भारताच्या टी-२० संघाने अक्षरचा फलंदाजीतील क्रमांक कायम बदलता ठेवला आहे. त्यामुळे त्याची सरासरी उंचावली आहे. त्याची सरासरी २०२२ पर्यंत २१.२६ (स्ट्राइक रेट १३१.२५) होती; मात्र आता त्यात (सरासरी ३०.३२ आणि स्ट्राइक रेट १४५.६२) सुधारणा झाली आहे. या दोन वर्षांत तो ३, ४, ६ आणि ७व्या क्रमांकावर आहे. त्यात त्याने चार अर्धशतके केली आहेत. भारतीय संघाने त्यामुळे हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रिंकूसिंह यांचाही फलंदाजीचा क्रमांक बदलता ठेवला आहे. अक्षर सध्या उपकर्णधार आहे. प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय; तसेच संघाच्या हितासाठी आवश्यक असलेले कठोर निर्णय घ्यायला त्याला शिकायचे आहे. त्याने याबाबत संघाच्या सहकारी प्रशिक्षकांसह चर्चा केली आहे. 'उपकर्णधार असल्यामुळे माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. सामना सुरू असताना काही निर्णय घ्यावे लागतात. त्याबाबत सूर्यकुमारसह चर्चा करीत आहे,' याकडे अक्षरने लक्ष वेधले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/I1oiHL0

No comments:

Post a Comment