Breaking

Tuesday, January 21, 2025

कोंबडी आधी की अंड? याच प्रश्नाचं उत्तर देऊन नम्रता शिरोडकर जिंकलेली मिस इंडियाचा किताब https://ift.tt/UcfZ36m

मुंबई- ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आता लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शनपासून दूर आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, नम्रता शिरोडकर ही मिस इंडिया देखील राहिली आहे. १९९३ मध्ये नम्रताने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिचे आयुष्य बदलले. तिने मिस युनिव्हर्स आणि मिस एशिया पॅसिफिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र ते किताब जिंकण्यात तिला अपयश आले. इतर सौंदर्य विजेत्या अभिनेत्रींप्रमाणे, नम्रता शिरोडकरला अभिनेत्री होण्याची घाई नव्हती. मिस इंडियामध्ये नम्रताने तिच्या स्विमसूट राउंडमध्ये इतका खळबळ उडवली की तिला पाहून सगळेच वेडे झाले होते. आज नम्रता तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. नम्रताची आजी होती स्विमसूट घालणारी पहिली अभिनेत्री मिस इंडिया नम्रता शिरोडकर: इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा कॅटवॉकचा प्रश्न यायचा तेव्हा शिरोडकर सिस्टर्ससाठी ते सोपे काम असायचे. तिची बहिण शिल्पा आतापर्यंत खूप गाजली, आता नम्रता शिरोडकरने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर आपल्या स्विमसूटने चर्चा निर्माण केली आहे. मॉडेलिंग हे नम्रताच्या रक्तात होते. तिची आजी, मीनाक्षी, भारतीय चित्रपटसृष्टीत स्विमसूट घालणारी पहिली अभिनेत्री होती. मिस इंडियाच्या तिसऱ्या फेरीत, नम्रताने परीक्षकांना सांगितले की जर तिला तिच्या बेडवर काउंट ड्रॅक्युला दिसला तर ती निश्चित त्याच्याशी मैत्री करेल, परंतु आधी तिला खरोखर त्याची भीती वाटेल. नम्रताला विचारलेले प्रश्नतिच्या उत्तराने परीक्षक प्रभावित झाले. यावर माजी ब्युटी क्वीन संगीता बिजलानी म्हणाली की नम्रता 'हॉट फेव्हरिट' होती. मात्र, ज्या उत्तराने तिला तो मुकुट जिंकता आला तो कोंबडी-अंडीच्या कोड्यावर आधारित प्रश्न होते. कोंबडी की अंड प्रथम कोण आले असे विचारले असता तिने उत्तर दिले, 'कोंबडी, जर कोंबडी नसती तर अंडीही नसते.' अभिनेत्री पूजा बत्रा १९९३ मध्ये मिस इंडियाची उपविजेती होती तर नम्रता हिला विजेतेपद मिळाले होते. तो क्षण मला आयुष्यभर लक्षात राहील.एका मुलाखतीत त्या क्षणाबद्दल बोलताना नम्रता शिरोडकर म्हणाली, 'माझी सर्वात मौल्यवान आठवण म्हणजे मिस इंडियाचा मुकुट परिधान करणे, मी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मग मेक्सिकोमध्ये मिस युनिव्हर्समध्ये जाऊन इतक्या लोकांना भेटले, वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा अनुभवल्या, मला इतके मित्र मिळाले, ही गोष्ट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने मिस युनिव्हर्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. जेव्हा तिला विचारले गेले की ती स्वतःला पारंपारिक मानते की आधुनिक? तर ती म्हणाली, 'मी स्वतःला दोन्ही समजते कारण आम्ही आमच्या कुटुंबातील परंपरा पाळतो, त्याच वेळी मी एक आधुनिक महिला आहे कारण मी माझ्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवते.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ObfJ2Ty

No comments:

Post a Comment