Breaking

Friday, January 17, 2025

खो-खो विश्वचषक २०२५ : भारताचे पुरुष आणि महिला संघ सेमी फायनलमध्ये दाखल https://ift.tt/Ue1ELFZ

नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पाडाव केला. भारताच्या पुरुष संघानेही कमाल कामगिरी केली. त्यामुळे आता भारताचा पुरुष आणि महिला संघही सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने ५० गुणांची कमी केली. तर संरक्षणात ६ ड्रीम रान मिळवत मध्यंतराला ५६-०८ अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा १०९-१६ असा ९३ गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सामन्याचा आढावा

दुसऱ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेशमा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल ५ मिनिटे ३६ सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये ६ गुण जोडले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेशमा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर १०६-८ असा होता. शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. भारतीय संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना १०९-१६ अशा निर्णायक फरकाने जिंकला.खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारताच्या पुरुष संघाने सुध्दा महिलांपाठोपाठ गुणांचे शतक करत मोठा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर १००-४० (मध्यंतर ५८-१८) असा ६० गुणांनी चमकदार विजयाची नोंद केली व उपांत्य फेरीत धडक मारली. रामजी कश्यप, प्रतीक वाईकर, आणि आदित्य गणपुले यांच्या अप्रतिम कामगिरी भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रामजी कश्यप या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताच्या दोन्ही संघाची उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी लढत होईल.

सामन्यातील पुरस्कार:

सामन्याचा सर्वोत्तम आक्रमक: मगई माझी (भारत)सामन्याचा सर्वोत्तम बचावपटू: ऋतुराणी सेन (बांगलादेश )सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: अश्विनी शिंदे (भारत)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cmISYp0

No comments:

Post a Comment