Breaking

Thursday, January 16, 2025

आदिवासी विकास मंत्र्यांची आश्रमशाळेला भेट, विद्यार्थ्यांमध्ये रमले; सेल्फी काढण्याचाही मोह आवरला नाही https://ift.tt/cnP7tCQ

म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेंगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील सेंट्ल किचनबाबत तक्रारी आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी शाळेला भेट देऊन सेंट्रल किचनचीही तपासणी केली आहे. त्यानंतर डॉ.ऊईके यांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थींनीशी संवाद साधत भोजनासह, सुविधांबाबत विचारणा केली. यावेळी टापटीप नाईट ड्रेसमध्ये असलेल्या विद्यार्थींनीमध्ये मंत्र्यांसह सचिव विजय वाघमारे देखील चांगलेच रमलेत. यावेळी मंत्र्यांसह सचिवांनाही विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मंत्र्यांसह सचिवांनी आपल्याशी थेट संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून निकृष्ठ दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार आमदार हिरामण खोसकर यांनी केली होती.यानंतर आयुक्त नयना गुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.त्यानंतर डॉ.उईके हे नाशिक दौऱ्यावर आले असता,सोमवारी रात्री या आश्रमशाळेला तसेच सेंट्रल किचनला भेट दिली.यावेळी मंत्र्यांनी किचनची पाहणी केल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी भोजन चांगले मिळते का, गणवेश मिळाला का,नाईटड्रेस मिळाला का,शालेय साहित्य मिळाले का,शिक्षक नियमीत येतात का अशी सरबत्ती मंत्री उईकेंसह सचिव वाघमारेंनी यावेळी केली. विद्यार्थ्यांनीही बिनधास्तपणे मंत्र्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत गणवेश,नाईटड्रेस,शालेय साहित्य मिळाल्याचे यावेळी सांगितले. यावेळी टापटीप नाईट ड्रेसमध्ये आलेल्या या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह सचिवांसह मंत्र्याना टाळता आला नाही. मुंढेगाव प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल तसेच या प्रकरणाच्या आडून कोणी विभागाची बदनामी करू नये असा इशाराही मंत्र्यांनी यावेळी सेंट्रल किचनधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेला दिला आहे.आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके हे या आश्रमशाळेवर प्रथमच आले होते.यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधतांना,तुम्ही मला ओळखले का असा सवाल त्यांनी एका विद्यार्थींनीला केला.त्यावर एका विद्यार्थींनीने तुम्ही आदिवासी विकास मंत्री डॉ.ऊईके सर आहात असे उत्तर दिले.त्यावर तु मला कसे ओळखले असा सवाल त्यांनी पुन्हा केला.त्यावर तुम्ही नागपूरमध्ये झालेल्या आदिवासी क्रिडा स्पर्धेला आला होता,आणि तुमच्या हस्ते मी पदक घेतल्याचे सांगितल्याने मंत्रीही आवाक झालेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5luCBi0

No comments:

Post a Comment