Breaking

Monday, January 13, 2025

वयाच्या पंचवीशीतच झाली विधवा, क्रू मेंबरला वाचावायला सिंहाशी भिडलेली अभिनेत्री, लेक दगावल्यावर इंडस्ट्रीचीच बनली आई https://ift.tt/waBTo4Q

मुंबई- एक काळ असा होता की भारतात नाटके, चित्रपट इत्यादींमध्ये स्त्रियांना स्थान नव्हते. मुघल-ए-आझममध्ये जोधाबाई आणि सलीमच्या आईच्या भूमिकेत दिसलेल्या यांनी बॉलीवूडमध्ये अशा काळात अभिनय केला जेव्हा हे क्षेत्र पुरुषांच्याच वर्चस्वात होते. त्या काळात पुरुषांनीच अनेकदा महिलांच्या भूमिका केल्या होत्या. दुर्गा खोटे यांना अशी बॉलिवूड अभिनेत्री म्हणता येईल, ज्यांनी सिनेविश्वात महिलांसाठी नवे आयाम लागू केले. मिर्झा गालिब, मुरल-ए-आझम, दादी माँ, आनंद, मुसाफिर, बावर्ची, बॉबी, भरत मिलाप, नमक हराम आणि कर्ज हे त्यांचे काही संस्मरणीय चित्रपट आहेत. आज दुर्गा खोटे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्याबद्दल काही खास किस्से जाणून घेऊ. दुर्गा खोटे यांचा जन्म अतिशय श्रीमंत कुटुंबात झाला होता, पण त्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले, लग्न आणि संसारात सर्व काही ठीक चालू असतानाच, अचानक एके दिवशी त्यांच्या पतीचे निधन झाले, त्यावेळी दुर्गा खोटे यांचे वय केवळ २६ वर्षे होते. आणि त्या दोन मुलांची आई होत्या. पती गेल्यामुळे दुर्गा खोटे यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि इच्छा नसतानाही त्यांना सिनेइंडस्ट्रीत काम करावे लागले होते. बालपणीचे नाव विटा लाडदुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणी त्यांचे नाव विटा लाड. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग शामराव लाड होते तर आईचे नाव मंजुळाबाई. दुर्गा खोटे या श्रीमंत कुटुंबातील होत्या, ज्या काळात महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, त्या वेळी दुर्गा खोटे यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे शिक्षण घेतले होते.कॉलेजमधून बीएचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांचा विवाह एका श्रीमंत घरातील मुलाशी झाला, पतीचे नाव विश्वनाथ खोटे होते आणि ते मेकॅनिकल इंजिनियर होते, लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही काळ सासरच्यांनी घर चालवले पण नंतर त्यांचाही मृत्यू झाला. याच काळात दुर्गा खोटे यांनी चित्रपटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पहिला सिनेमा कसा मिळाला ?दुर्गा शिकलेल्या होत्या, त्यामुळे काही काळ त्यांनी मुलांना शिकवणी देण्यास सुरुवात केली, ज्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला. त्या काळात जे.बी. एच वाडिया यांच्याशी त्यांची ओळख होती, त्याच वेळी ते त्यांच्या चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत होते, त्यांनी त्यांच्या बहिणीला चित्रपटात भूमिका देऊ केली पण तिने नकार दिला, पुढे त्या भूमिकेसाठी त्यांनी दुर्गा खोटेंची निवड केली, दुर्गा खोटे यांनी हे पात्र साकारण्यास होकार दिला. १९३१ मध्ये प्रदर्शित झालेला फरेबी जाल असे या चित्रपटाचे नाव होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि तोही फ्लॉप झाल्याने त्यांना लोकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले.मुलं मुलींची भूमिका करत असतदुर्गा खोटे यांनी चित्रपटसृष्टीत अशा वेळी प्रवेश केला होता, जेव्हा मुलींच्या भूमिकाही मुलांनीच केल्या होत्या. दुर्गा खोटे यांच्यावर अशाप्रकारे चित्रपटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. श्रीमंत घरातील मुलगी चित्रपटात कशी काम करू शकते याच्या अनेक चर्चा होत्या. या चित्रपटातील त्यांची भूमिका फक्त १० मिनिटांची होती पण त्या भूमिकेसाठी त्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागले होते, लोकांच्या टोमण्यांमुळे त्या दुखावल्या आणि त्यामुळे त्या चित्रपट जगतापासून दुरावल्या. तथापि, नंतर व्ही. शांताराम यांच्या आग्रहास्तव, त्यांनी पुन्हा या इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि ५ दशके या इंडस्ट्रीचा भाग राहिल्या. फ्रीलान्स काम करणारी पहिली अभिनेत्रीदुर्गा खोटे ही स्टुडिओ प्रणाली (चित्रपटात काम करण्यासाठी त्याच स्टुडिओशी मासिक वेतन करार) मोडणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री होती आणि फ्रीलान्स काम करणारी पहिली अभिनेत्री ठरली.तिचा जीव वाचवण्यासाठी सिंहाशी लढा दिलादुर्गा खोटे या कोल्हापुरात एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या, त्यादरम्यान काही सिंहांना शूटिंगसाठी सेटवर आणण्यात आले होते. त्या सिंहांचा ट्रेनरही त्यांच्यासोबत होता पण अचानक सिंहाने क्रू मेंबरवर हल्ला केला. त्या माणसाला वाचवण्यासाठी दुर्गा यांनी सिंहाशी लढा दिला. काही वेळाने ट्रेनरने सिंहाला शांत केले आणि दुर्गाही थोडक्यात बचावल्या. फिल्म इंडस्ट्रीची 'आई' बनलीदुर्गा खोटे चित्रपटात चांगले नाव कमावत असताना त्यांच्या एका मुलाचे निधन झाले. मुलाच्या जाण्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता, पण तरीही त्यांनी ऑनस्क्रीन आईची भूमिका केल्या. तिने मुघल-ए-आझम चित्रपटात सलीमच्या आई जोधाबाईची भूमिका साकारली होती, जी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. याशिवाय त्यांनी मुगल-ए-आझम, जीत, सिंगार, हम लोग, मिर्झा गालिब, दो भाई, पहली, पापी आणि दौलत का दुश्मन या चित्रपटांमध्येही आईची भूमिका साकारली होती.दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या चौथ्या महिलादुर्गा खोटे यांनी जवळपास ५० वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले आणि जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. १९८० चा कर्ज हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या दुर्गा खोटे या चौथ्या महिला आहेत. याशिवाय त्यांना पद्मश्री आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. १९९१ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QDezT10

No comments:

Post a Comment