मुंबई : पंकज सावंतच्या हॅट्रीकच्या जोरावर टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या संघाने महिंद्रा आणि महिंद्राच्या संघावर सहा विकेट्स राखून दमदार विजय साकारला. पंकजच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर टाइम्स ऑफ इंडियाच्या संघाने महिंद्राच्या संघाचा फक्त ८४ धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर श्रावण भोसलेच्या दमदार खेळीच्या जोरावर टाइम्स ऑफ इंडियाच्या संघाने सहा विकेट्स राखत हा सामना सहजपणे जिंकला. टाइम्स शिल्डच्या इ डिव्हिजनध्ये हा सामना खेळवला गेला. महिंद्राच्या संघाची या सामन्यात प्रथम फलंदाजी होती. पंकज सावंतने यावेळी तिखट मारा केला आणि महिंद्राच्या संघाला एकामागून एक तीन धक्के दिले. पंकजने यावेळी चार षटके गोलंदाजी केली. या चार षटकांमध्ये पंकजने फक्त १४ धावा दिल्या आणि तीन फलंदाजांना सलग बाद केले. पंकज सावंतला यावेळी सुयोग्य साथ मिळाली ती प्रसाद पाटीलची. प्रसाद पाटीलने दमदार गोलंदाजी करत फक्त ९ धावा दिल्या आणि यावेळी त्याने महिंद्राच्या दोन फलंदजांना बाद केले. टाइम्सच्या मुदीत बोरकरनेही यावेळी फक्त १० धावा देत दोन बळीही पटकावले. टाइम्सच्या संघापुढे यावेळी विजयासाठी ८५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना टाइम्सच्या संघाने चांगली सुरुवात केली आणि १७ षटकांतच हा सामना जिंकला. टाइम्सच्या संघाकडून यावेळी श्रवण भोसलेने धडाकेबाज फटकेबाजी केली. श्रवणने यावेळी २६ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळे टाइम्सच्या संघाला मोठा विजय मिळवता आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4BeoGdc
No comments:
Post a Comment