मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आज तिचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. सुप्रिया पाठकची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. आणि सुप्रिया पाठक या दोघांचे पहिले लग्न मोडले होते. त्यांच्या पहिल्या अयशस्वी नातेसंबंधातून बाहेर पडल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्न केले. आईच्या मैत्रिणीच्या मुलावर प्रेमवयाच्या २२ व्या वर्षी सुप्रिया पाठक आपल्या आईच्या मैत्रीणीच्या मुलाच्या प्रेमात पडल्या. या कमी वयात जडलेल्या प्रेमामुळे अभिनेत्रीने घाईघाईत लग्न केले. जितक्या घाईथ त्यांनी लग्न केले तितक्या लवकर त्यांना समजले की हे नाते फार काळ टिकणार नाही. लग्नाला जेमतेम आठवडा उलटल्यानंतर त्यांना लग्नाचा पश्चाताप होऊ लागला. लग्नाच्या वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला पंकज कपूर यांच्याशी पहिली भेटसुप्रिया एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी भंटीडा येथे गेली होत्या, त्याच चित्रपटात पंकज कपूर देखील काम करत होते. काही कारणास्तव हा चित्रपट रिलीज झाला नाही पण पंकज आणि सुप्रिया यांचे सूर मात्र जुळले. त्यावेळी पंकज कपूर यांचे नीलिमा अझीमसोबतचे लग्नही तुटले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पंकज आणि सुप्रिया यांची चांगली मैत्री झाली होती.पंकज यांना दारूचे व्यसन होतेसुप्रिया यांनी पंकज कपूरबद्दल चुकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. पंकज कपूर मद्यपान करणारे आणि खूप रागीट माणूस असल्याचं त्यांनी ऐकलं होतं. सेटवर भेटल्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि जेव्हा त्यांनी हँग आउट करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजले की या सर्व गोष्टी अफवा आहेत. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सुप्रिया यांनी पंकज कपूरना फोन करायला सांगितले होते. दिलेल्या शब्द पाळत पंकज यांनी फोन केला. दोघांनाही त्यावेळी कळले की ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्नपंकज आणि सुप्रिया पाठक जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांचे लग्न झाले. जेव्हा सुप्रिया यांची आई दिना पाठक यांना या नात्याबद्दल सांगितले तेव्हा त्या तयार झाल्या नाहीत. पण सुप्रिया यांनी आईची खूप समजूत घातली तेव्हा त्यांनी होकार दिला. दोघांनी १९८९ मध्ये लग्न केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iHhzPuD
No comments:
Post a Comment