Breaking

Tuesday, January 7, 2025

सासरच्यांना पसंत नव्हती सागरिका घाटगे, झहीर खानने दाखवली ‘ती’ सीडी, लगेच मिळाला होकार https://ift.tt/o58QJjY

मुंबई- चक दे इंडिया या सिनेमातून गाजलेली अभिनेत्री आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटपटू जहिर खानसोबत लग्न केले. सुरुवातीला धर्माच्या भींतींमुळे त्यांच्या घरच्यांची लग्नाला परवानगी नव्हती. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिची लव्हस्टोरी जाणून घेऊ. आणि सागरिका घाटगे एका पार्टीत भेटले होते. त्या पार्टीत दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पहिल्या भेटीनंतर झहीरच्या मित्रांनी सागरिकाच्या नावाने त्याला चिडवायला सुरुवात केली. त्यावेळी दोघांमध्ये मैत्री नव्हती. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यावर प्रेमाचा रंग चढला. झहीरने सागरिकाला २०१७ मध्ये गोव्यात प्रपोज केले होते. दोघेही आयपीएलमध्ये काही काळ गोव्यात होते. यानंतर चक दे इंडिया फेम सागरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या एंगेजमेंटची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. झहीर-सागरिकाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी होकार. सागरिका घाटगेच्या आईला झहीरबद्दल माहिती होती पण अभिनेत्रीच्या वडिलांना याची माहिती नव्हती. त्यांनी झहीरला २० मिनिटे भेटीसाठी बोलावले. पण सुमारे ३ तास दोघांमधील संवाद सुरू होता. त्यानंतर सागरिकाच्या वडिलांनीही लग्नाला होकार दिला. झहीरच्या कुटुंबीयांचा आधी लग्नाला नकार होता. या आंतरधर्मीय विवाहापूर्वी, झहीरच्या कुटुंबाने सागरिकाच्या चक दे इंडिया या चित्रपटाची सीडी ऑर्डर केली आणि पाहिली ज्यामध्ये ती भारतीय महिला संघाची कर्णधार बनली होती. त्यानंतर झहीरच्या कुटुंबीयांनी लग्नाला ग्रीन सिग्नल दिला. दोघांनी २३ नोव्हेंबर २०१७ रोजी कोर्ट मॅरेज केले होते. कोण आहे सागरिका घाटगे? सागरिका घाटगेचे वडील विजेंद्र घाटगे हे देखील अभिनेते आहेत. त्यांचे आजोबा शाहो महाराज हे कोल्हापूरचे महाराज होते. या बॉलिवूड अभिनेत्रीची आजी सीता राजे घाटगे या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या होत्या. सागरिका ही राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूही आहे. सागरिका घाटगेने लग्नानंतरही धर्म बदलला नाही. झहीर खानची क्रिकेट कारकीर्द झहीर खाननने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट्स घेतल्या आहेत, तर २८२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २८२ विकेट्स आहेत. झहीरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. झहीरच्या नावावर कसोटीत ३ अर्धशतके आहेत. झहीर आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघात मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qcExzNu

No comments:

Post a Comment