Breaking

Tuesday, January 14, 2025

खेळली, धडपडली अन् बाबाच्या कुशीत जाऊन बसली... राहा आणि रणबीरचा क्युट Video Viral https://ift.tt/YEZFgQq

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा तिच्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आजकाल ती केवळ स्वत:चेच नाही तर नवरा रणबीर आणि मुलगी राहासोबतचे गोड क्षणही शेअर करते. आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा आता पॅप्सची लाडकी बनली आहे. राहा जेव्हा जेव्हा पॅप्सना पाहते तेव्हा ती तिच्या गोंडस कृतींनी सर्वांची मन जिंकते. अलीकडेच, हे जोडपे त्यांची लाडकी मुलगी राहा कपूरसोबत शहरातील पॅडेल कोर्टवर दिसले. आलिया कोर्टमध्ये तिच्या अ‍ॅथलेटिकचा सराव करत होती आलिया कोर्टवर बॅड मिंटनचा सराव करत होती, तर दुसरीकडे रणबीर मुलगी राहाची काळजी घेण्यात आणि तिच्यासोबत मजामस्ती करण्यात व्यस्त होता. रणबीर, आलिया आणि राहाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे चाहत्यांची मने जिंकत आहेत. या व्हिडिओमध्ये राहा तिच्या वडिलांसोबत म्हणजेच रणबीर कपूरसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. राहा धावताना पडली. सेलिब्रिटी पापाराझी व्हायरल भयानी यांनी रणबीर-आलिया आणि राहाचे व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यापैकी एका व्हिडिओमध्ये राहा धावता धावता अचानक पडते त्यानंतर ती स्वत:ला सावरते अन् आपल्या बाबांकडे जाते. रणबीरसुद्धा आपल्याला मुलीला लागलं तर नाही ना हे नीट पाहतोय आणि तिची काळजी घेतो. राहा पडल्यावर लगेच आपल्या बाबांच्या कुशीत जाऊन बसते आणि रणबीर तिची काळजी घेतो हा क्षण सर्व सोशल मीडिया युजर्सना खूप आवडला आहे. बरेचजण कमेंट करुन त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. थायलंडनंतर रणबीर-आलिया आणि राहा पहिल्यांदाच दिसले एकत्र अलिकडेच, आलिया-रणबीर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह थायलंडला गेले होते. परदेशातून परतल्यानंतर रणबीर-आलिया आणि राहा पहिल्यांदाच एकत्र दिसले. यादरम्यान, आलिया काळ्या शॉर्ट्स आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये तिचा स्पोर्टी लूकमध्ये दिसली होती, तर रणबीरने खाकी पँट, पांढरा टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घातले होते. रणबीर सध्या त्याच्या रामायण सिनेमाचे शूटिंग करत आहे. या शिवाय लवकरच रणबीर आलिया लव्ह एण्ड वॉर या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत विकी कौशलसुद्धा असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ifD6Sdy

No comments:

Post a Comment