Breaking

Tuesday, January 14, 2025

एकाच सिनेमात ३० किसिंग सीन देऊन मोडलेला इम्रान हाश्मीचा रेकॉर्ड, अखेर बायकोनेच घातली बेडसीनवर बंदी https://ift.tt/7kt5MpJ

मुंबई- बॉलिवूडमधले बरेच सिनेमे हे त्यातल्या किसिंग सीनमुळे गाजतात. आजकाल अनेक कलाकार सह किसिंग सीन देतात. पण एका अभिनेत्याने थेट इम्रान हाश्मीचाही रेकॉर्ड मोडला होता. बॉलिवूड तसेच साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता नील नितीन मुकेशसाठी आजचा दिवस खूप खास आहे, कारण तो आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. नीलचे नाव स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी ठेवले होते. नीलचे वडील नितीन मुकेश हे मोठे गायक आहेत. पण त्याने अभिनेता होण्याचा मार्ग निवडला. नील नितीन मुकेशने इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने प्रत्येक जॉनरमध्ये काम केले. पण तरीही त्याला हवे तसे यश मिळू शकले नाही. नील नितीन मुकेशचा एक चित्रपट आहे जो इंटिमेट सीन्सने भरलेला आहे. हा चित्रपट एक हॉरर-थ्रिलर असून त्या चित्रपटाचे नाव ३ जी. तब्बल ३० किसिंग सीन हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सोनल चौहान ही मुख्य अभिनेत्री होती. या चित्रपटाचे नाव होते आनंद, त्याचे दिग्दर्शन शंतनू रॉय चिब्बर यांनी केले होते. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच त्याची बरीच चर्चा निर्माण झाली होती. चित्रपटात तबब्ल ३० किसिंग सीन होते. चित्रपट फ्लॉप रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या 'मर्डर' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला होता. 'मर्डर' मध्ये २० किसिंग सीन्स होते. पण किसिंग सीनचा काही उपयोग झाला नाही. प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही. या चित्रपटाला खूपच कमी रेटिंग मिळाले आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटाने जगभरात ५.९ कोटी रुपये कमावले. पण सिनेमाच्या मेकिंगचे बजेट वसूल झाले नाही. नील नितिन मुकेशने बालकलाकार म्हणूनच कामाला सुरुवात केलेली. २००२ मध्ये आलेल्या मुझसे दोस्ती करोगी या सिनेमात त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. जॉनी गद्दार सिनेमातून त्याने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर त्याने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले पण त्याचा त्याच्या करिअरवर विशेष फायदा झालेला नाही. गेला बराच काळ नील सिनेमांमध्ये दिसलेला नाही. नीलच्या किसिंग सीनमुळे त्याला एकदा तंबी देण्यात आलेली. त्याने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेली की केवळ इंटिमेट सीन करायला नकार दिला म्हणून त्याच्या हातून बरेच सिनेमे गेले. खरेतर लग्नापूर्वी त्याची पत्नी रुक्मिणीने त्याच्या पुढे ही अट ठेवलेली. जर का तो ऑनस्क्रिन किसिंग सीन किंवा बेड सीन करणार नाही तरच ती त्याच्याशी लग्न करेल. नील म्हणाला की आम्ही दोघेही वेगवेगळ्या बॅक ग्राउंडमधून आलेल्या व्यक्ती आहोत. पण आमचे सिनेमांसाठीचे प्रेमच आम्हाला जवळ घेऊन आले. आता जरी तिला समजलंय की माझं काम कसं असतं तरीही तिने मला इंटिमेट सीन द्यायला नकार दिला आहे. इंटिमेट सीन देऊ शकत नसल्यामुळे माझ्या हातातून काम जाते. सध्या ओटीटीवर बरेच काम आहे पण ही अट मध्ये येते त्यामुळे मी नकार देतो. नीलने २०१७ मध्ये रुक्मिणीशी लग्न केले. त्यांना आता एक मुलगी पण आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/s3oRuBb

No comments:

Post a Comment