Breaking

Tuesday, February 25, 2025

Govinda जन्मला येताच त्याला मुलगा मानायलाही तयार नव्हते वडील, ना कुशीत घेतलं ना प्रेम दिलं; एवढी नाराजी का? https://ift.tt/6QtgFdo

मुंबई- बॉलिवूडचा हिरो नंबर १ आज ज्या स्थानावर आहे तिथे पोहोचायला त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत बराच संघर्ष करावा लागला होताहोता. एका चित्रपट निर्मात्याचा मुलगा असूनही, गोविंदाने लहानपणी अलिशान आयुष्य जगले नाही. त्यांचे वडील अरुण कुमार यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अभिनेते म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. मात्र त्यांचे सिनेमे चांगले चालले नाही आणि कुटुंबाला खूप कठीण काळातून जावे लागले.१९५० च्या दशकात, चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी त्यांची घरे आणि मालमत्ता गहाण ठेवत असत, गोविंदाचे वडीलही तेच करायचे. याचा परिणाम असा झाला की चित्रपट फ्लॉप झाला आणि गोविंदाच्या वडिलांचे वांद्रे येथे जे आलिशान घर होते ते सोडून त्यांना, त्यांना विरार येथे जावे लागले, जे मुंबईच्या बाहेरील भागात आहे. गोविंदाच्या जन्माच्या काही काळापूर्वीच त्याच्या वडिलांमधील आणि आईमधील अंतर वाढले होते. त्यानंतर या नात्यात कटुता निर्माण झाली. हे प्रकरण इतके वाढले की गोविंदाच्या वडिलांनी त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारण्यासही नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची आई त्याच्या जन्माच्या काही महिने आधी साध्वी बनली होती. त्याचे वडील याबद्दल खूप रागावले. ते यासाठी गोविंदाला दोष देऊ लागले. ते त्याच्या आईच्या या वागण्याला गोविंदाला जबाबदार मानत असे.गोविंदाची आई निर्मला देवी, या एक प्रसिद्ध गायिका होत्या, त्यांनी प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलाची काळजी घेतली. त्यांनी एकटीने अभिनेत्याला वाढवले. गोविंदा नेहमीच त्याच्या आईला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार मानत असे. मोठा झाल्यानंतर गोविंदाने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याचा पहिला चित्रपट 'इल्झाम' १९८६ मध्ये प्रदर्शित झाला, जो खूप हिट झाला. हळूहळू तो ९० च्या दशकातील सर्वात मोठा सुपरस्टार बनला. गोविंदाचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते, परंतु त्याच्या आईच्या पाठिंब्याने आणि स्वतःच्या मेहनतीने तो बॉलिवूडचा बादशहा बनला. एका मुलाखतीत त्याने सांगितले की एकेकाळी त्याच्याकडे इतके पैसे होते की त्याचे काय करावे हे त्याला कळत नव्हते. 'हर घर कुछ कहता है' या चॅट शोमध्ये विनय पाठकशी बोलताना गोविंदाचा भाऊ कीर्ती म्हणाला, "एके दिवशी त्याने आम्ही ज्या खोलीत होतो ती खोली बंद केली आणि सर्व पैसे, सर्व बँक कागदपत्रे दाखवली."गोविंदाने सांगितले की मी खूप आनंदी होतो, पण त्या पैशांचे काय करायचे हे आम्हाला माहित नव्हते आणि गोविंदाचा पहिला विचार होता १०० रिक्षा खरेदी करण्याचा विचार केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/d8MSIxc

No comments:

Post a Comment