Breaking

Tuesday, February 25, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना बीसीसीआयचा खेळाडूंबाबत मोठा निर्णय, आता करावी लागणार डबल मेहनत https://ift.tt/7Tfr4LX

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असतानाच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंबाबत आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आता डबल मेहनत घ्यावी लागणार असल्याचे आता समोर आले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची कशी झाली कामगिरी..

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात बांगलागेशवर सहज विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तावर मात केली आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

भारतीय संघ पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर आहे...

भारताने जेव्हा बांगलादेशला पराभूत केले होते, तेव्हा ते दुसऱ्या स्थानावर होते. पण पाकिस्तानवर दमदार विजय मिळवल्यावर त्यांनी अव्वल स्थान पटकावले होते. पण त्यानंतर न्यूझीलंडने बांगलादेशला नमवले आणि ते अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. पण जर भारताने न्यूझीलंडला पराभूत केले तर त्यांना पुन्हा पहिले स्थान मिळवता येऊ शकते.

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना कोणता निर्णय घेतला..

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या निर्णयामुळे आता खेळाडूंना डबल मेहनत करावी लागणार आहे. कारण आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु आहे, त्यानंतर आयपीएल रंगणार आहे. आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळायला जाणार आहे. पण भारतीय संघाला यावेळी कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी वेळ कसा मिळणार, हा प्रश्न बीसीसीआयला पडला होता. त्यानंतर त्यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीआयने आता असा निर्णय घेतला आहे की, आयपीएल सुरु असताना भारतीय कसोटी संघातील खेळाडूंना थोडा वेगळा वेळ काढावा लागणार आहे, ज्यामध्ये त्यांना कसोटी मालिकेसाठी लाल चेंडूने सराव करावा लागणार आहे. त्यामुळे भारताचे जे खेळाडू कसोटी संघात आहेत त्यांना आता डबल मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे जेतेपद भारत पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ag2H18V

No comments:

Post a Comment