Breaking

Friday, February 7, 2025

महाराष्ट्राचा मर्चंट नेव्ही तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता; कुटुंबियांना एजंटची उडवाउडवीची उत्तरे https://ift.tt/fctnoJk

अजय गर्दे, धुळे: धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला २१ वर्षीय तरुण यश देवरे ओमानच्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यश देवरे ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ओएस (ऑर्डिनरी सीमॅन) पदावर कार्यरत होता. कामानिमित्त तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला होता. गेली ७ महिने तो बोटीवर कार्यरत होता. अचानक तो बेपत्ता झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना समजली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरखली. या घटनेला एक आठवडा उलटला असून अजूनही त्याचा शोध सुरू असल्याची माहिती कंपनी कडून देण्यात येत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. गेल्या सात महिन्यांपासून जहाजावर असलेल्या यश देवरे याच्याशी कुटुंबीयांचा नियमित संपर्क होता. २८ जानेवारीच्या संध्याकाळी यशचा शेवटचा संपर्क कुटुंबियांशी झाला. त्यानंतर २९ जानेवारीला दुपारी दोन वाजता जहाज कंपनीकडून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली की, यश जहाजावरून पाय घसरून समुद्रात पडला असून त्याचा शोध सुरू आहे. त्यानंतर वारंवार कुटुंबियांकडून कंपनीला यशसंबंधी विचारणा करण्यात आली मात्र कोणतीही ठोस माहिती कुटुंबीयांना मिळालेली नाही.या घटनेमुळे देवरे कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून त्यांनी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे यशचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे. जहाज कंपनीकडून अद्याप शोधकार्य सुरू असल्याचीच माहिती मिळत आहे. मात्र, यशबाबत अधिकृत माहिती कधी मिळणार, याकडे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे. त्याच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार यश देवरे हा जुलै महिन्यात मुंबई्च्या एंजटकरवी मुलगा दुबईला गेला होता. त्यानंतर गेले ७ महिने त्याच्याशी संपर्क होता. २९ जानेवारीला एंजंटचा फोन आला त्यांनी माहिती दिली की तुमचा मुलगा यश बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.एंजटला संपर्क करुन विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि यशची ठोस माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dkn5amG

No comments:

Post a Comment