Breaking

Sunday, February 9, 2025

बघू, वज्रमूठ किती दिवस टिकते! उदय सामंत यांचा विरोधकांना टोला https://ift.tt/kV6F1U9

म.टा.प्रतिनिधी, नागपूर: ‘शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र येत वज्रमूठ घट्ट असल्याचा दावा केला आहे. मात्र, कोणाच्या मनात काय सुरू आहे, कुठे जायचे आहे, हे ते सांगत नाहीत. त्यामुळे ही वज्रमूठ किती दिवस टिकते ते बघू’, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला. कोणी आव्हान दिल्यावर प्रतिआव्हान देणे गरजेचे नसते, असेही ते यावेळी म्हणाले.सामंत रविवारी नागपुरात आले असता विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, यासंबंधी सुरू असलेल्या चर्चेबद्दल विचारले असता सामंत म्हणाले, ‘माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी चर्चा झालेली नाही. यावर सविस्तर आम्ही सविस्तर बोलू. साळवी पक्षात येताना त्यांची इच्छा काय आहे, हे बघावे लागेल. माझे मोठे बंधू साळवींचा पराभव करून निवडून आले. त्यांनाही विश्वासात घ्यायचे आहे. सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय घेऊ.’ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रात इच्छुक आहेत. त्याचे पडसाद तुम्हाला बघायला मिळत आहेत. माझ्याकडे १५ तारखेला आभार दौरा आहे. त्यातही मोठे बदल दिसतील, असे सामंत म्हणाले. ‘इंडिया आघाडीचा प्रभाव फार काळ टिकणार नाही, हे आम्ही अगोदरच सांगितले होते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना पर्याय नाही. आघाडीच्या आमदारांचे भविष्य पुढील पंचेवीस वर्षांसाठी अंधकारमय दिसते’, असे सामंत म्हणाले. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी नाही‘ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘विरोधकांनी काय करावे, हा लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विरोधकांनी काय करावे, ही त्यांची भूमिका आहे. प्रकरण कोर्टात आहे. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांना फासांवर लटकवले पाहिजे. जोपर्यंत चौकशी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. त्याच्यातला एकही मारेकरी सुटू नये, हीच भूमिका शिवसेनेची असेल’, असे उदय सामंत म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Et0A4zN

No comments:

Post a Comment