Breaking

Monday, February 10, 2025

पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक करू नका, रवी शास्त्री यांनी सांगितली 'ती' महत्वाची गोष्ट... https://ift.tt/3CntiwF

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीला आता काहीच दिवस उरले आहेत. पण त्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी पाकिस्तानबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री यांनी पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक करू नका, असे सांगितले आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी आता एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

पाकिस्तानसाठी कोणती गोष्ट महत्वाची...

रवी शास्त्री पाकिस्तानच्या संघाबाबत म्हणाले की, " पाकिस्तामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. पण त्यापेक्षा एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे. पाकिस्तानने गेल्या ६-७ महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या वनडे मालिका झाल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी विजय साकारला होता. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला आहे. गेल्या ६ महिन्यांत त्यांच्या एवढे वनडे क्रिकेट कोणी खेळले नसेल. त्यामुळे जो संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघांना पराभूत करून शकतो, त्यांना कधीही कमी लेखता कामा नये. कारण पाकिस्तानच्या संघाची चांगली घडी बसलेली आहे. फक्त त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली, तर ते या स्पर्धेत मोठा बदल घडवून शकतात. "

पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार का...

पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार की नाही, याबबात रवी शास्त्री म्हणाले की, " पाकिस्तानच्या संघाची गोलंदाजी चांगली होत आहे. फलंदाजीही त्यांची दमदार आहे. फक्त त्यांनी जास्त प्रयोग करता कामा नयेत. पाकिस्तानचा संघ आपल्या गुणवत्तेनुसार खेळला तर नक्कीच त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. पण त्यानंतर काय होऊ शकते, हे आता सांगता येणार नाही. पण पाकिस्तानचा संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या लायक नक्कीच आहे. " चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटात भारत आणि पाकिस्तान यांच्यासह बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना हा २३ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याची उत्सुकता तमाम क्रीडा विश्वाला असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6CV1Slr

No comments:

Post a Comment