Breaking

Friday, February 28, 2025

यंदा मराठवाड्याला पाण्याचे नो टेन्शन, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध https://ift.tt/l0Z9z4C

छत्रपती : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, मराठवाड्यात पाणीसाठ्याची उत्तम स्थिती आहे. विभागातील ८७९ प्रकल्पांत ६०.१६ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा असून, उन्हाळी पिकांसह पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्याला पाण्याचे नो टेन्शन असणार हे यावरून स्पष्ट होतंय. वाढत्या उन्हासह पाण्याच्या मागणीत आणि वापरात वाढमराठवाड्यात उन्हाची काहिली वाढली आहे. वाढत्या उन्हासह पाण्याच्या मागणीत आणि वापरात वाढ होत आहे. सद्यस्थितीत विभागातील धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पाणी टंचाई फारशी जाणवणार नसल्याची स्थिती आहे. मात्र, लघु प्रकल्पांत कमी पाणी असल्यामुळे काही गावांना पाणी टंचाई भेडसावणार आहे. सध्या ११ मोठ्या प्रकल्पात ७०.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पात ५३ टक्के आणि ७५१ प्रकल्पात ३७.१३ टक्के पाणीसाठा आहे.धरणात चांगला पाणीसाठा गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६.२७ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ प्रकल्पांत ८९ टक्के पाणीसाठा आहे. एकूण ८७९ प्रकल्पात ६०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाच्या सहायक मुख्य अभियंता यांनी सांगितले. मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा असून सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी ७९, सिद्धेश्वर ५५, माजलगाव ५५, मांजरा ७५, उर्ध्व पेनगंगा ७४, निम्न तेरणा ८१, निम्न मनार ६१, विष्णुपुरी ५३, निम्न दुधना ५२ आणि सिना कोळेगाव धरणात ६१ टक्के पाणीसाठा आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७ टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पात ४० टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ५८ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात ५१ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात ५७ टक्के, नांदेड जिल्ह्यातील नऊ प्रकल्पात ५९ टक्के आणि जिल्ह्यातील दोन प्रकल्पात ५६ टक्के पाणीसाठा आहे. दरवेळी उन्हाळ्याला सुरूवात झाली की, पाणी टंचाई हा मोठा विषय बघायला मिळतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fjPQdG0

No comments:

Post a Comment