Breaking

Saturday, March 1, 2025

IND vs NZ सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल, रोहित-शमीच्या जागी कोणाला मिळणार संधी पाहा... https://ift.tt/tCkNcIP

दुबई : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीत अपराजित राहीलेले आहे. या दोघांतील सामना हा रविवारी होणार आहे. पण या सामन्यासाठी भारतीय संघात आता तीन मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे.

पहिला बदल...

रोहित शर्माला न्यूझीलंडच्या सामन्या विश्रांती दिली जाऊ शकते, असे आता समोर येत आहे. पण रोहित संघात नसताना कोणाला कर्णधारपद द्यायचे, हा सर्वात मोठा निर्णय असेल. रोहित नसताना उप कर्णधार असलेल्या शुभमन गिलला यावेळी नेतृत्व करण्याची संधी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा जर खेळणार नसेल तर त्याच्या जागी भारतीय संघात आता ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते, असे समोर येत आहे.

दुसरा बदल...

मोहम्मद शमीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. यापुढे भारताला सेमी फायनल खेळायची आहे, त्यामुळे शमीला या सामन्यात खेळवण्याची जोखीम आता भारतीय संघ नक्कीच उचलणार नाही. कारण तो दुखापतीमधू सावरल्यावर आता भारतीय संघात आला आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती दिली तर त्याच्या जागी भारताच युवा डावखुरा फलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते.

तिसरा बदल...

भारतीय संघात तिसरा बदल हा फिरकी गोलंदाजीमध्ये होणार असल्याचे आता समोर येत आहे. कारण गेल्या सामन्यात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनाही संधी देण्यात आली होती. पण या न्यूझीलंडच्या सामन्यासाठी भारतीय संघात आता वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी आता भारतीय संघामधून रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला वगळले जाऊ शकते. गेल्या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर अक्षर पटेलला वगळण्याची जास्त शक्यता असल्याचे दिसत आहे.भारतासाठी हा सामना महत्वाचा असेल. कारण हा सामना भारताने जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर विराजमान होता येणार आहे. त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7ajc5Ef

No comments:

Post a Comment