Breaking

Wednesday, February 5, 2025

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात उतरताच उडाला गोंधळ, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तणाव का वाढला पाहा... https://ift.tt/LR4Bd1X

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तानात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला. पण पाकिस्तानचा संघ जेव्हा न्यूझीलंडमध्ये दाखल झाला तेव्हा एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.भारताने यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तन पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामना खेळण्यात नकार दिल्याचे पाहायला मिळाले होते. पण या गोष्टीचा प्रत्यय यावेळी न्यूझीलंडच्या संघाला आल्याचे म्हटले जात आहे. कारण न्यूझीलंडचा संघ जेव्हा पाकिस्तानात दाखल झाला त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता फक्त न्यूझीलंडचाच संघ दाखल झाला आहे, त्यानंतर अन्य संघ जेव्हा दाखल होतील तेव्हा पाकिस्तानात काय परिस्थिती असेल, याचा विचार आतापासून सर्वजण करायला लागले आहेत.न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला आणि त्यांच्या संघातील खेळाडूंचे टेंशन वाढले. कारण यापूर्वी त्यांनी अशी परिस्थिती पाहिली नव्हती. पाकिस्तानात उतरल्यावर मात्र त्यांना एक वेगळाच अनुभव आला. पाकिस्तानात दाखल झाल्यावर बऱ्याच गोष्टींमध्ये क्रिकेटपटूंना गोंधळ पाहायला मिळाला. कोणत्याही गोष्ट सरळ साध्या मार्गाने होत नव्हत्या. साध्या साध्या गोष्टींसाठीही जास्त वेळ लागत होता. सर्व ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. कारण पाकिस्तानमधील लोकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पाकिस्तानने या संघांच्या सुरक्षेसाठी विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत आपले सेनादलातील जवान तैनात केले होते. त्यामुळे खेळाडूंच्या हॉटेलला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूला आता हॉटेल सोडून बाहेर जाता येणार नाही. एखाद-दुसऱ्या सामन्यासाठी अशी व्यवस्था सर्व ठिकाणी असू शकते. पण न्यूझीलंडच्या संघाला तब्बल दीड महिने या पाकिस्तानच्या जवानांच्या छावणीतच राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मानसीकतेवर या गोष्टीचा परीणाम होऊ शकतो, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघात तणाव वाढल्याचे समोर यआले आहे.पाकिस्तानाच दहशतवादी हल्ल्यांचे संकट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारत वगळता अन्य देशांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला खास योजना आखावी लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले आहे. कारण प्रत्येक शहरात आता सेनेचे जवान तैनात असतील. त्यामुळे सामान्य लोकांच्या समस्याही वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. पण पाकिस्तानसाछी सुरक्षेचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे समोर आले आहे.पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही संघात तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडचा संघ बुधवारी पाकिस्तानात दाखल झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uC2Jql7

No comments:

Post a Comment