मुंबई- गेले काही दिवस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांनी एका कॉन्सर्ट दरम्यान एका महिला चाहतीच्या ओठांवर किस केले होते. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. उदित नारायण यांच्या या कृतीने चाहत्यांनाही धक्का बसला. यावर उदित नारायण यांनी स्वतःचा बचाव केला असला तरी त्यांच्यावर कडक टीका होत आहे. दरम्यान, यांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित नारायण यांचा बचाव केलाच पण त्याच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दलही सांगितले जेव्हा त्यांना तीन-चार मुलींनी किस केले होते. अभिजीत भट्टाचार्य यांच्याकडून उदित नारायण यांचे समर्थन अभिजीत भट्टाचार्य यांनी न्यूज18 ला सांगितले की, 'उदित हा एक सुपरस्टार गायक आहे आणि अशा घटना आम्हा गायकांसोबत नेहमीच घडत असतात. जर आम्हाला योग्यरित्या सुरक्षा दिली गेली नाही किंवा बाउन्सर्स नसतील तर लोक आम्हाला घेरतात आणि आमचे कपडे सुद्धा फाडतात. माझ्यासोबत हे आधीही घडलं आहे. अभिजीतसोबतही घडलेला किसचा प्रकार अभिजीत पुढे म्हणाले, 'मी इंडस्ट्रीत नवीन असताना, दक्षिण आफ्रिकेत एका कॉन्सर्ट दरम्यान, तीन-चार मुलींनी माझ्या गालावर इतके खतरनाक किस केले की मी स्टेजवर जाऊ शकलो नाही. हे सर्व लता मंगेशकरजींसमोर घडले होते. माझ्या गालावर लिपस्टिकच्या खुणा होत्या. 'मुली उदित नारायणच्या मागे लागल्या होत्या' अभिजीत भट्टाचार्य पुढे म्हणाले, 'तो उदित नारायण आहे.' मुली त्याच्या मागे लागल्या होत्या. त्याने कोणालाही आपणहून स्वतःकडे आकर्षित केले नाही. मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा उदित परफॉर्मन्स देतो तेव्हा त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत सह-गायक म्हणून येते. त्याला त्यांच्या यशाचा आनंद घेऊ द्या. तो एक रोमँटिक गायक आहे आणि एक उत्तम वादक देखील आहे. उगीच कोणी त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. मुलीला किस करण्याबद्दल उदित नारायण काय म्हटले? मुलीला किस करण्यावरून झालेल्या वादाबद्दल उदित नारायण यांनी 'एचटी सिटी'ला सांगितले की, 'चाहते इतके भावनिक असू शकतात, पण आम्ही तसे नाही. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. काही लोक त्याचा प्रचार करतात आणि अशा प्रकारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. त्यातून एवढी मोठी गोष्ट काढण्याचा काय अर्थ आहे? गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे अंगरक्षकही तिथे आहेत. पण चाहत्यांना असे वाटते की जणू त्यांना आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे - काही जण हात पुढे करून भेटतात, काही जण हातांचे चुंबन घेतात... हे सर्व त्यांच्या भक्तीचा भाग आहे. याकडे इतके लक्ष देऊ नये.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/R9MFeVq
No comments:
Post a Comment