
मुंबई - ८० चे दशक हा ग्लॅमरचा काळ होता. जेव्हा बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांचं स्वतःचं आकर्षण होतं. आज मनोरंजनाची साधने खूप सोपी झाली आहेत. तुम्ही प्रवास करत असाल किंवा घरी, YouTube आणि OTT प्लॅटफॉर्मवरील कोणताही कंटेंट कुठेही पाहता येतो. पण ८० च्या दशकात दूरदर्शन हे लोकांसाठी मनोरंजनाचे एकमेव साधन होतं. त्या काळात 'हम लोग', 'बुनियाद', 'नुक्कड', 'सर्कस' हे दूरदर्शनवरील मुख्य कार्यक्रम असायचे. या टीव्ही मालिकांमध्ये बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'लाही खूप लोकप्रियता मिळाली. हा शो इतका प्रसिद्ध झाला की, आजही लोक त्याबद्दल चर्चा करतात. बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' बद्दल अनेक कथा आहेत. प्रत्येक पात्र साकारणाऱ्या कलाकारांच्या कास्टिंगमागे एक वेगळीच कहाणी आहे. या मालिकेत उत्तराची भूमिकाही प्रसिद्ध झाली. हे पात्र यांनी साकारलं होतं. वर्षा, अनेक टीव्ही मालिकांचा भाग राहिल्या आहेत. त्या ग्लॅमर जगतातील एक लोकप्रिय चेहरा आहेत. लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने महाभारत शोमधील तिच्या कास्टिंगबद्दल खुलासा केला होता. वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, त्यांना उत्तराची भूमिका योगायोगाने मिळाली. त्या शूटिंग पाहण्यासाठी सेटवर गेल्या होत्या. शूटिंग पाहण्यासाठी गेल्या असताना, अभिमन्यूसोबत एक सीन शूट केला जात होता आणि त्याच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी कोणाचा तरी शोध सुरू होता. अट फक्त एवढीच होती की मुलीला शास्त्रीय नृत्य येत असलं पाहिजे.
अशा प्रकारे वर्षा यांना उत्तराची भूमिका मिळाली
वर्षा म्हणाल्या की, जेव्हा त्या सेटवर पोहोचल्या तेव्हा प्रोडक्शन डिझायनर गुफी पेंटल तिथे होते. त्यांनी वर्षा यांना पाहिलं आणि विचारलं की त्या उत्तराची भूमिका करतील का? जेव्हा अभिनेत्रीच्या पालकांना हे कळलं तेव्हा त्यांनी लगेचच त्यांची मुलगी ही भूमिका करेल असं मान्य केलं. वर्षा, महाभारत शोचा भाग होणार याचा त्यांचापेक्ष पालकांना जास्त आनंद झाला असं वर्षा म्हणाल्या. भूमिकेचा प्लस पॉइंट म्हणजे त्या शास्त्रीय नृत्य शिकल्या होत्या. लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत वर्षा यांनी असंही सांगितलं की, कोणत्याही स्क्रीन टेस्टशिवाय त्यांना उत्तराच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आलं. सर्व काही फायनल झालं आणि ती बी.आर. चोप्रा यांची 'उत्तरा' बनली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AKUozEs
No comments:
Post a Comment